“शिवसेना - भाजप युती व्हावी हीच इच्छा”; रविंद्र फाटकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:43 PM2022-06-22T17:43:25+5:302022-06-22T17:44:23+5:30

एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड थोपविण्यासाठी मंगळवारी रविंद्र फाटक हे मिलिंद नार्वेकर यांच्यासमेवत सुरतमध्ये दाखल झाले होते.

wish of shiv sena bjp alliance ravindra phatak meet mp shrikant shinde | “शिवसेना - भाजप युती व्हावी हीच इच्छा”; रविंद्र फाटकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

“शिवसेना - भाजप युती व्हावी हीच इच्छा”; रविंद्र फाटकांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे:एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड थोपविण्यासाठी मंगळवारी रविंद्र फाटक हे मिलिंद नार्वेकर यांच्यासमेवत सुरतमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर बुधवारी फाटक यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवास्थानी जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून त्यांनी देखील शिवसेना भाजप युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती फाटक यांनी दिली. तसेच शिंदे यांनी अद्यापही शिवसेना सोडलेली नाही, किंवा ते सोडणारही नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांचे बंड थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे रविंद्र फाटक आणि मिलिंद नाव्रेकर यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. त्यानंतर हे दोघे मंगळवारी सुरत येथे जाऊन शिंदे यांची भेट घेतली. २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर ते दोघे परत आले. त्यानंतर बुधवारी फाटक यांनी शिंदे यांच्या निवास्थानी जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देखील श्रीकांत यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी बंड शमविण्यासाठी चर्चा केल्याची माहिती फाटक यांनी दिली. तसेच त्यांची देखील मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे श्रीकांत यांनी देखील शिंदे यांच्या भुमीकेबाबत काही बोलण्यास नकार दिला असला तरी देखील शिवसेना - भाजपची युती व्हावी अशी आशा त्यांनी व्यक्त केल्याचेही फाटक यांनी सांगितले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी करणो हे देखील अयोग्यच होते. असेही त्यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान तासभर चर्चा केल्यानंतर फाटक यांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी फाटक यांच्याशी चर्चा केली असता, शिंदे हे शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शिवसेनेतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यातही शिंदे यांनी काही चुकीच्या मागण्या केलेल्या नसून त्यांच्या मागण्या सफल व्हाव्यात आणि त्यांच्या सकट सर्व आमदार शिवसेनेत राहोत हीच इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: wish of shiv sena bjp alliance ravindra phatak meet mp shrikant shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.