उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीवर जादूटोणा; शिपायावर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: October 13, 2023 05:49 PM2023-10-13T17:49:22+5:302023-10-13T17:49:36+5:30
महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा अघोरी प्रकार बुधवारी उघड झाला आहे.
उल्हासनगर : महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा अघोरी प्रकार बुधवारी उघड झाला आहे. याप्रकरणी कार्यालयातील शिपाई धनंजय गायकवाड यांच्यावर जादूटोणा गुन्हा अंतर्गत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर महापालिका सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी मुख्यालय मागील चार्जिंग स्टेशन जवळ बुधवारी सकाळी कार पार्किंग केली होती. कार्यालयातून संध्याकाळी घरी जातांना, त्यांच्या कारच्या चाकाखाली निंबु ठेवल्याचे, काही कर्मचाऱ्यांना हिवरे यांना सांगितले. त्यांनी झालेल्या प्रकारचे फोटो काढून कारच्या चाकाखाली निंबु कोणी ठेवले. आदींची माहिती घेण्यासाठी महापालिका सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, कार्यालयाचा शिपाई धनंजय गायकवाड हा कारच्या चाकाखाली निंबु ठेवल्याचे उघड झाले. हिवरे यांनी झालेला प्रकार आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना सांगितल्यावर, या कारस्थाना मागे मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास लागण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली.
महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र मनीष हिवरे यांना देऊन, शिपाई धनंजय गायकवाड यांच्याकडे केलेल्या कृत्या बाबत खुलासा मागितला आहे. महापालिका अधिकाऱ्यांचा गाड्यावर जादूटोणा सारखे प्रकार उघड झाल्याने, महापालिका वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले. आयुक्त अजीज शेख यांनी झालेला प्रकार दुर्दैवी असून याबाबत सखोल तपास करणार असल्याची माहिती दिली. तर माझ्या विरोधात काहीतरी कटकारस्थान चालत असून यामागील खरा सूत्रधार कोण? त्यांचे नावे उघड होण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली.अशी माहिती हिवरे यांनी दिली. पोलिसांनी धनंजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत सखोल चौकशी केल्यास मुख्य सुत्रधारकाचे नाव उघड होणार आहे.
महापालिका अधिकऱ्यावर जादूटोणा? महापालिका सहायक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्या कारवर जादूटोणा केल्याने, महापालिकेत तर्कवितर्ककाला उत आला. नगररचनाकार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभाग आदी विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे..