Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या आशीर्वादाने बेकायदा फटाके विक्री स्टॉलचा सुळसुळाट   

By धीरज परब | Published: October 24, 2022 10:47 PM2022-10-24T22:47:24+5:302022-10-24T22:47:50+5:30

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेने केवळ २० ठिकाणी फटाके स्टॉल ना परवानगी दिल्याची यादी जाहीर केली असताना दुसरीकडे शहरात सर्वत्र बेकायदा फटाका स्टॉलचा सुळसुळाट झाला आहे.

With the blessings of Mira Bhayander Municipal Corporation, illegal firecrackers stalls are flourishing | Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या आशीर्वादाने बेकायदा फटाके विक्री स्टॉलचा सुळसुळाट   

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या आशीर्वादाने बेकायदा फटाके विक्री स्टॉलचा सुळसुळाट   

googlenewsNext

- धीरज परब

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने केवळ २० ठिकाणी फटाके स्टॉल ना परवानगी दिल्याची यादी जाहीर केली असताना दुसरीकडे शहरात सर्वत्र बेकायदा फटाका स्टॉलचा सुळसुळाट झाला आहे . महापालिकेच्या आशीर्वादाने बेधडकपणे फटाका विक्री स्टॉल सुरु असून उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व कायदे - नियम पायदळी तुडवले जात असताना पोलिसांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर शासनाने देखील फटाके विक्रीचे परवाने मोकळ्या जागेत वा पटांगणात देण्याचे निर्देश दिले आहेत . इतकेच नव्हे तर शासनाने सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी तसेच निवासी इमारती मध्ये फटाके विक्रीस परवाने देऊन नये .  बेकायदा फटाके विक्री वा साठवणूक वर तात्काळ कारवाई करावी असे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारची अधिसूचना सुद्धा फटाक्यांच्या विक्रीसाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या कडून परवानगी हवी असे सांगते . स्टोल बंदिस्त हवा व दोन स्टॉल मध्ये किमान ३ मीटर अंतर हवे असे केंद्राच्या अधिसूचनेत स्पष्ट आहे .   शिवाय फटाके हे अतिशय स्फोटक असल्याने भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे. 

परंतु महापालिकेने फटाके विक्रीची परवानगी दिलेल्या २० पैकी बहुतांश ठिकाणी न्यायालय , केंद्र व राज्य शासन तसेच कायदे गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट आहे.

त्यात कहर म्हणजे पालिकेने दिलेल्या २० ठिकाणा व्यतिरिक्त शहरात गल्लीबोळा पासून मुख्य रस्ते , मुख्य नाके ,  सार्वजनिक ठिकाणी अगदी ज्वलनशील गॅस आदी वापरणाऱ्या हातगाड्यांच्या लगत मोठ्या संख्येने बेकायदा फटाके विक्री करणारे स्टॉल लागलेले आहेत. 

बेकायदा स्टॉल उघडपणे सर्वत्र लागलेले असताना देखील महापालिकेचा फेरीवाला पथक , प्रभाग अधिकारी पासून अतिक्रमण विभाग प्रमुख व उपायुक्त व अग्निशमन दलाने संरक्षण दिलेले असल्यानेच त्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे .  मध्यरात्री पर्यंत हे बेकायदा फटाके विक्री स्टॉल सुरू असतात.  ह्या बेकायदा फटाका विक्री स्टॉल ना पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी नाहरकत दिली कि नाही ? हे सुद्धा गुलदस्त्यात असून पोलीस सुद्धा ह्या गंभीर बाबीं कड़े कानाडोळा करत आहेत . फटाके विक्रेत्यांचा प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी लोकांच्या जीवाशी खेळ चालवल्याचा आरोप जागरूक नागरिक करत आहेत . हा मोठा भ्रष्टाचार असून यात पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी लोक करत आहेत.

- प्रकाश बोराडे ( प्रभारी अग्निशमन दल प्रमुख ) - अग्निशमन दलाने परवानगी दिलेल्या फटाके विक्रीच्या २० ठिकाणांची यादी सुरवातीलाच प्रभाग कार्यालयांना दिली आहे . बेकायदा स्टॉल वर त्यांच्या मार्फत कारवाई केली जाते व गुन्हे दाखल केले जातात .

Web Title: With the blessings of Mira Bhayander Municipal Corporation, illegal firecrackers stalls are flourishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.