कोणत्याही तपासणीविना चक्क ७०० किमी प्रवास, ४५ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:17 AM2020-04-13T01:17:36+5:302020-04-13T01:17:47+5:30

भिवंडीतून मजुरांची वाहतूक; ४५ जणांना घेतले ताब्यात

Without any scrutiny, it was 700 km, 45 arrest by police | कोणत्याही तपासणीविना चक्क ७०० किमी प्रवास, ४५ जणांना घेतले ताब्यात

कोणत्याही तपासणीविना चक्क ७०० किमी प्रवास, ४५ जणांना घेतले ताब्यात

Next

तळेगाव (श्या.पंत)/वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी असतानाही भिवंडी येथून ४५ मजूर मालवाहतुकीच्या वाहनात बसून उत्तर प्रदेशातील अलाहबाद येथे जात होते. कोणत्याही तपासणीविना त्यांनी चक्क ७०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला तरीही त्यांना कुठेच अडविण्यात आले नाही.
नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव (श्या.पंत) येथील तपासणी नाक्यावर त्यांचे वाहन अडविण्यात आले. त्यात ४५ मजूर
दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या भिवंडी परिसरात विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कंपनीकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने ४५ मजुरांनी ओळखीच्या असलेल्या मालवाहनाच्या चालकासोबत गावाचा रस्ता धरला.
 

Web Title: Without any scrutiny, it was 700 km, 45 arrest by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.