अधिसूचनेशिवायच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:23 AM2019-01-08T03:23:05+5:302019-01-08T03:24:07+5:30
समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे.
पंकज पाटील
अंबरनाथ : समृद्धी महामार्गाव्यतिरिक्त इतर कामासाठी भूसंपादन केले जाणार असून ती जागा नेमकी कोणती आहे, याची कल्पना केवळ अधिकारीवर्गालाच आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दलालांची फळी पुढे करून शेतकºयांच्या जागा समृद्धी महामार्गात खरेदी करण्याचे काम सुरू केले. शेतकºयांनाही मोबदला चांगला मिळत असल्याने त्यांनी जागा देण्यासाठी दलाली देण्याची कबुली दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही जागा जाणारच आहे, याची कल्पना शेतकºयांना नसल्याने त्यांची दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचा आरोप समृद्धीबाधित शेतकरी संघटनेने केला आहे.
समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे. समृद्धीच्या मूळ प्रस्तावासोबत इतर जागा समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने घेण्यात येणार आहे. मात्र, ती जागा नेमकी कोणती आहे, याची कल्पना शेतकºयांना नाही. याचे सर्व आराखडे अधिकाºयांकडे असल्याने जी जागा समृद्धीसाठी घेण्यात येणार आहे, त्या जागेच्या ठिकाणी असलेल्या शेतकºयांना फसवण्याचे काम दलालांनी सुरू केले आहे. शेतकºयांची जागा समृद्धीत जात असताना त्याच शेतकºयाला ती जागा समृद्धीमध्ये घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. मुळात ती जागा जाणार आहे, याची कल्पना नसल्याने शेतकरी जागा यावी, यासाठी दलालांच्या आश्वासनांना बळी पडत आहेत. जागा गेल्यावर टक्केवारी ठरत असल्याने शेतकºयांच्या हक्काचे पैसे नाहक दलालीपोटी जात आहेत. मुळात शेतकºयांची जी जमीन जाणार आहे, त्या जागेचे नोटीफिकेशन तसेच त्याची प्रसिद्धी करणे गरजेचे आहे. तरच त्याची माहिती शेतकºयांना होईल. मात्र, नोटीफिकेशन न झाल्याने शेतकºयांना आपली जागा जात आहे, याची कल्पनाच नाही. याच संधीचा फायदा घेत अधिकाºयांनी नेमलेल्या दलालांमार्फत शेतकºयांसोबत परस्पर आर्थिक व्यवहार करून भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. उशीद गावाच्या परिसरातील शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. उशीद गावातील अनेक शेतकºयांची जमीन जात असतानाही नोटीफिकेशन न काढताच भूसंपादनाची प्रक्रिया केल्याचा आरोप चंद्रकांत भोईर यांनी केला आहे.
शेतकºयांना मोबदला वाढवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलालांनी दलाली लाटली आहे. भूसंपादन करताना शेतकºयांच्या शेतातील झाडांची संख्या आणि त्याचे मूल्य वाढवून घेण्याचे काम केले. सोबत, घर असलेल्या जागेवरील घरांचे मूल्य जास्त दाखवत शेतकºयांना पैसे देण्यात आले. मात्र, त्या पैशांतून दलाली लाटण्यात आली आहे. अधिकाºयांनी याच मार्गाने मोठी माया जमवल्याचा आरोप भोईर यांनी केला.
यासंदर्भात शासनस्तरावर तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात अधिकाºयांना ताकीद दिलेली होती. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भोईर यांनी केली. भूसंपादनाची जबाबदारी ही अधिकाºयांवर असल्याने थेट कोणताच व्यवहार अधिकाºयांसोबत झाला नाही. मात्र, अधिकाºयांनी नेमलेले दलाल हे गबर झाले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यास समृद्धीमध्ये सर्वाधिक लाभार्थी हे अधिकारी आणि दलाल असल्याचे चित्र त्यांनी स्पष्ट केले.