ठाण्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक

By जितेंद्र कालेकर | Published: November 10, 2021 10:29 PM2021-11-10T22:29:58+5:302021-11-10T22:32:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील पाचपाखाडीतील एका इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या सदनिकेत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेला ...

Woman arrested for operating sex racket in Thane | ठाण्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक

नौपाडा पोलिसांची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देचार पीडित महिलांची सुटकानौपाडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील पाचपाखाडीतील एका इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या सदनिकेत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तिच्या तावडीतून चार पीडित महिलांची सुटका केली आहे.
पाचपाखाडीतील एका इमारतीमध्ये एक महिला आपल्याच घरामध्ये काही महिलांमार्फत शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली धुमाळ यांच्यासह पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर आणि उपनिरीक्षक विनोद लभडे आदींच्या पथकाने नौपाड्यातील या इमारतीमध्ये एका बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. त्यावेळी वीणा पावेसर (नावात बदल) ही महिला ३० ते ४५ वयोगटातील महिलांना पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळले. यातून एका महिलेमागे दहा हजारांची रक्कम ती घेत असे. त्यातील निम्मी रक्कम या महिलांना देऊन, उर्वरित रक्कम ती स्वत:कडे ठेवत होती. याच रकमेवर ती उपजीविका करीत असल्याचे आढळल्याने तिच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ३७० नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीनंतर पोलिसांनी तिला मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अटक केली.
भर वस्तीमध्ये सुरू असलेल्या या सेक्स रॅकेटमुळे नौपाडा परिसरात एकच खळबळ उडाली. तिचे आणखी कोण साथीदार आहेत का, आणखी किती महिलांना तिने या व्यवसायात ओढले आहे, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Woman arrested for operating sex racket in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.