हॉटेलमध्ये शरीर विक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या महिलेस अटक: दोन पिडित तरुणींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 07:35 PM2020-12-11T19:35:37+5:302020-12-11T19:37:40+5:30
चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करुन त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा ...
चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करुन त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाºया अफसाना उर्फ जान्हवी लष्कर (३३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. तिच्या तावडीतून दोन पिडित तरुणींची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एका ठराविक मोबाईल क्रमांकावर फोन केल्यानंतर एक महिला शरीर विक्रयासाठी काही तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या पथकाने सहायक पोलीस आयुक्त सुनिल बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजीवडा येथील हॉटेल कॅपिटॉल येथील एक रुम बुक करुन या महिलेकडे मुलींबाबत विचारणा केली. एका बनावट गिºहाईकाच्या मदतीने ठराविक रक्कम ठरल्यानंतर १० डिसेबर रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास या पथकाने या हॉटेलमध्ये सापळा लावला. त्यावेळी दोन तरुणींना घेऊन आलेल्या अफसाना या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. काही पैशांचे अमिष दाखवून या तरुणींकडून ती शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे चौकशीमध्ये उघड झाले. याप्रकरणी जमादार भगवान थाटे यांनी चितळसर पोलीस ठाण्यात या आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. तिला ११ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. तिचे या रॅकेटमध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.