तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या महिलेस अटक,पैशांचे आमिष : दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:07 AM2017-10-13T02:07:31+5:302017-10-13T02:07:45+5:30

पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या मंगल बागडे (रा. मनोरमानगर, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

 Woman arrested for sexually assaulting woman, money laundering: Two-day police custody | तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या महिलेस अटक,पैशांचे आमिष : दोन दिवसांची पोलीस कोठडी

तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या महिलेस अटक,पैशांचे आमिष : दोन दिवसांची पोलीस कोठडी

Next

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या मंगल बागडे (रा. मनोरमानगर, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.  तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
मानपाडा भागात एका महिलेकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, तानाजी वाघमोडे, हवालदार अविनाश बाबरेकर, विजय बडगुजर, नाईक नीशा कारंडे आदींच्या पथकाने १० आॅक्टोबर रोजी वाघबीळनाका, दलाल इंजिनीअरिंग वर्कसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. तिच्या ताब्यातून ३० वर्षीय पीडित महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.
बागडे हिच्याकडून तीन हजार ३८० ची रोकड आणि दोन मोबाइल असा ९ हजार ३८० चा ऐवज हस्तगत केला. तिच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कोणती टोळी सामील आहे का? आणखी किती महिलांची तिने अशा प्रकारे फसवणूक केली.

Web Title:  Woman arrested for sexually assaulting woman, money laundering: Two-day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.