रेल्वे प्रवासात चोरी करणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:05+5:302021-08-21T04:46:05+5:30
डोंबिवली : घाटकोपर ते डोंबिवलीदरम्यान गुरुवारी जलद लोकलच्या दुसऱ्या वर्गाच्या महिलांच्या डब्यातून प्रवास करीत असताना ठाणे ते ...

रेल्वे प्रवासात चोरी करणाऱ्या महिलेस अटक
डोंबिवली : घाटकोपर ते डोंबिवलीदरम्यान गुरुवारी जलद लोकलच्या दुसऱ्या वर्गाच्या महिलांच्या डब्यातून प्रवास करीत असताना ठाणे ते डोंबिवली स्थानकादरम्यान एका सहप्रवाशाच्या खांद्याला अडकविलेली पर्सची चेन उघडून त्यातील छोट्या पर्समधील १६ हजार रुपयाची रक्कम चोरण्यात आली. मात्र, त्याचदरम्यान सहप्रवाशांनी महिला आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
अफरीन अलीअहमद अन्सारी (१८, रा. रूम नंबर ३६, बी. ब्लॉक, विनोबा भावेनगर, कुर्ला पश्चिम) असे महिला चोराचे नाव आहे. इंदुमती बागुल यांनी अन्सारीविरुद्ध चोरीची तक्रार दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार अन्सारी हिची अंगझडती घेतली असता तिच्या जीन्स पॅन्टच्या खिशात रोख १६ हजार रुपये आढळून आले. त्यामुळे तिला अटक केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी दिली.
---------------