विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी 

By अजित मांडके | Published: November 2, 2023 12:17 PM2023-11-02T12:17:38+5:302023-11-02T12:20:40+5:30

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन माहिती कक्षाने दिली.

woman dies after brick slab falls one was injured | विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी 

विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी 

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा-विटावा सुर्यानगर परिसरात तळ अधिक एक मजली इमारतीचा स्लॅब गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास कोसळला. या घटनेत ३० ते ३५ वर्षीय चंद्रिका जनार्दन नामक या महिलेचा मृत्यू झाला असून लीलावती शहाजान कुंजू (६५) या आजीबाई जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत  घरात ४ जण होते. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

विटावा येथे २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या तळ अधिक एक मजली इमारतीमधील नवनाथ गोळे यांच्या मालकीच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर एका महिलेच्या अंगावरती पडून, त्या महिलेचा मृत्यू झाला असून, एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच त्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून इमारत धोकादायक स्थितीत आहे. अशी  माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बिट निरीक्षक व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (कळवा प्रभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. या घटनेत चंद्रिका जनार्दन (३३) यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्या महिलेला उपचारासाठी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले आहे.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: woman dies after brick slab falls one was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात