रुग्णवाहिका न आल्याने महिलेची रस्त्यावर प्रसूती, ठाण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:28 PM2020-05-22T12:28:50+5:302020-05-22T12:29:54+5:30
महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी प्रयन्त केले मात्र प्रयत्न करूनही रुग्णवाहिका आली नाही.या सगळ्या घोळात दोन ते अडीज तास निघून गेले आणि रात्री अडीजच्या सुमारास या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.
ठाणे - ठाण्यात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने वागळेत रस्त्यावर तडफडत 60 वर्षीय व्यक्तीने आपले प्राण सोडल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.किसननगर क्रमांक 3 मधील भटवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला अचानक गुरुवारी मध्यरात्री प्रसूती कळा सुरू झाल्या. महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी प्रयन्त केले मात्र प्रयत्न करूनही रुग्णवाहिका आली नाही.या सगळ्या घोळात दोन ते अडीज तास निघून गेले आणि रात्री अडीजच्या सुमारास या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.
येथे प्लम्बरचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीला गुरुवारी मध्यरात्री अचानक प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याची आवश्यकता होती मात्र रुग्णाविहिक प्रयत्न करूनही वेळेवर आली नाही. त्यामुळे त्यांनी रिक्षा मिळते का यासाठी प्रयत्न केला मात्र ती सुद्धा मिळाली नाही अखेर या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.या ठिकाणाहून जात असलेल्या एका पोलिसाने हा प्रकार बघितल्यानंतर त्यांनी कुठून तरी रिक्षा आणल्यानंतर त्यांना मुलुंडच्या बीएमसीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळ आणि आई दोघेही व्यवस्थित आहे.