भिंत कोसळून महिला जखमी, दोन कार व 2 मोटारसायकलचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:46 PM2021-06-09T17:46:26+5:302021-06-09T17:46:57+5:30

उल्हासनगर गोलमैदान परिसराला तलावाचे साम्राज्य

Woman injured in wall collapse, two cars and two motorcycles damaged in ulhas nagar | भिंत कोसळून महिला जखमी, दोन कार व 2 मोटारसायकलचे नुकसान 

भिंत कोसळून महिला जखमी, दोन कार व 2 मोटारसायकलचे नुकसान 

Next
ठळक मुद्देशहरातील राधाबाई चौक, खेमानी परिसरात गटारीचे झाकण उघडे असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसलीतरी दोन्ही नद्या काटोकाट भरून वाहत आहेत.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : संततधार पावसाने गोलमैदान परिसरासह शहरातील अनेक भागात तलावाचे साम्राज्य निर्माण झाले. तर हिरो होंडा शोरूम शेजारी सरंक्षण भिंत कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली असून दोन कार व दोन मोटारसायकलचे नुकसान झाले. 

उल्हासनगरात संततधार पावसाने अनेक भागात पाणी साचून तलावाचे साम्राज्य निर्माण झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी आपत्कालीन पथकाला तुंबलेले पाणी उपसा काढण्याचे आदेश दिले. तसेच उल्हास व वालधुनी नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे व कामा शिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन केले. गोल मैदान, शिरू चौक, आमदार कुमार आयलानी यांच्या समोरील रस्ता, फर्निचर मार्केट, आयटीआय शाळे समोरील रस्ता, कैलास कॉलनी, फॉरवर्ड लाईन रस्ता, १७ सेक्शन, उल्हासनगर जुने बस स्टॉप, महादेवनगर, मोर्यानगरी रस्ता आदी ठिकाणी गटारी तुंबल्याने तलावाचे स्वरूप रस्त्याला आले आहे. नाल्याची साफसफाई व्यवस्थित न झाल्याने शहराला तलावाचे स्वरूप आल्याची टीका मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केले. 

शहरातील राधाबाई चौक, खेमानी परिसरात गटारीचे झाकण उघडे असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसलीतरी दोन्ही नद्या काटोकाट भरून वाहत आहेत. कॅम्प नं-३ शांतीनगर होंडा शोरूम जवळील सरंक्षण भिंत कोसळल्याने दोन कार व दोन मोटारसायकलचे नुकसान झाले. तर एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. १२ जून पर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी नेटके यांनी केले. अतिरिक आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, सहायक आयुक्त गणेश शिंपी आदीसह प्रभाग अधिकारी व आपत्काली पथक पावसाळी घटनेकडे लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Woman injured in wall collapse, two cars and two motorcycles damaged in ulhas nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.