रिक्षाच्या धडकेमध्ये स्कूटरवरील महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:44 PM2020-12-24T18:44:01+5:302020-12-24T18:45:04+5:30
रिक्षाने दिलेल्या धडकेमध्ये स्कूटरवरुन जाणारी सुरेखा त्रिंबके (२९, रा. लोकमान्यनगर, ठाणे) ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना एक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर येथे घडली होती. रुग्णालयात उपचारानंतर संतोष त्रिंबके यांनी याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रिक्षाने दिलेल्या धडकेमध्ये स्कूटरवरुन जाणारी सुरेखा त्रिंबके (२९, रा. लोकमान्यनगर, ठाणे) ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना एक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर येथे घडली होती. याप्रकरणी औषधोपचारानंतर सुरेखा यांचे पती संतोष यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली.
संतोष आणि त्यांची पत्नी सुरेखा हे दोघेही १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्कूटरवरुन कामावर जात होते. त्यावेळी लाकडी पुलाजवळील डॉ. खताळ यांच्या रुग्णालयासमोर ते आले असता लाकडी पूलाकडून लोकमान्यनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरघाव वेगाने जाणाºया रिक्षाने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सुरेखा यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला जबर मार लागून त्या जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतर या रिक्षा चालकाने तिथून पलायन केले होते. रुग्णालयात उपचारानंतर संतोष त्रिंबके यांनी याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.