महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

By सदानंद नाईक | Published: November 7, 2022 06:02 PM2022-11-07T18:02:36+5:302022-11-07T18:03:27+5:30

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

woman strangled to death by boyfriend incident took place within the limits of ulhasnagar hilline police station | महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

महिलेचा गळा आवळून प्रियेकराने केली हत्या; उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Next

सदानंद नाईक उल्हासनगर : दोन दिवसांपूर्वी भाड्याच्या घरात आलेल्या महिलेचा प्रियेकरांनी गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार नेवाळी येथील साईनगर चाळीत सोमवारी सकाळी उघड झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रियेकरचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पी डी कराडकर यांनी दिली. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका येथील चाळीत एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची माहिती सोमवारी सकाळी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवून पंचनामा केला. दोन दिवसापूर्वी चाळीत राहण्यास आलेल्या लक्ष्मीबाई मनोहर तायडे हिचा प्रियकर असलेला बबन देवकाते याने गळा घोटून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पती सोबत पटत नाही म्हणून अकोलावरून लक्ष्मीबाई तायडे ही नेवाळी येथे आली. प्रियेकर असलेला विक्की बबन देवकाते यांचे यापूर्वी लग्न झाले असून तो म्हाडा कोटर्स मध्ये कुटुंबासह राहत होता. असी माहिती पोलिसांनी दिली. 

मयत लक्ष्मी मनोहर तायडे ही महिला हत्या होण्यापूर्वी नक्की शहरात कुठे राहत होती. तसेच प्रियकर विक्की बबन देवकाते याचाही शोध हिललाईन पोलीस घेत आहेत. भाड्याच्या खोलीत आलेल्या नवरा-बायको म्हणून राहण्यास आल्याचे, चाळीकरांचे म्हणणे आहे. दोघा मध्ये कोणते टोकाचे वाद होऊन हत्या झाली. याचा तपास पोलीस करीत असून विक्की देवकाते याच्या शोधासाठी दोन पोलिसांचे पथके तैनात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कराडकर यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: woman strangled to death by boyfriend incident took place within the limits of ulhasnagar hilline police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.