अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 08:39 PM2019-01-21T20:39:00+5:302019-01-21T21:37:13+5:30

अनैतिक संबंध असलेल्या महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तिचा खून करुन काटा काढणा-या नालासोपारा येथील अबरार शेख (३८) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिटने मोठया कौशल्याने सोमवारी अटक केली.

The woman's murder suspect arrested in connection with immoral relations | अनैतिक संबंधातून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीस अटक

ठाणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेची कामगिरी

Next
ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेची कामगिरीजळालेल्या कागदातून मिळाला तपासाचा दुवा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

ठाणे: अनैतिक संबंधातून निर्मला सचिन यादव (४८, रा. नालासोपारा, जि. पालघर) हिचा डोक्यात प्रहार करुन नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणा-या अबरार शेख (३८, रा. नालासोपारा) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. कोणताही धागादोरा नसतांना अर्धवट जळालेल्या एका कागदावरील मजकूराच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.
नालासोपारा येथील मराठी भाषिक निर्मलाचा मुळच्या उत्तरप्रदेशातील सचिन यादव याच्याशी विवाह झाला होता. नालासोपाºयामध्येच तिचे किराणा मालाचे दुकान आहे. याच दुकानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सिगरेट खरेदीच्या निमित्ताने येणाºया अबरार याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीतून ते एकमेकांच्या ‘जवळ’ आले होते. लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्याशी अनैतिक संबंधही ठेवले होते. पुढे तिने त्याला लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तो तिला टाळाटाळ करु लागला. १५ जानेवारी २०१९ रोजी ती काही कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी निघाली तेंव्हा त्याने तिला घोडबंदर रोडवर लग्नाची बोलणी करण्याच्या निमित्ताने घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल येथे बोलावून घेतले. तिथे आल्यानंतर तो तिला गप्पा मारण्याच्या नावाखाली २५ फूट आत जंगलात फिरायला घेऊन गेला. एका निर्जनस्थळी त्यांच्यात लग्नाच्या विषयावरुन वाद झाल्यानंतर त्याने तिच्या डोक्यावर प्रहार करुन तिचा खून केला. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिच्याच बॅगेतील कपडयांनी आणि पाला पाचोळयाच्या सहाय्याने तिला पेटवून दिले. यात तिचा मृतदेह जळाल्यानंतर त्याने तिथून पलायन केले. १६ जानेवारी रोजी काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश ढाकणे हे मुंबई अहमदाबाद मार्गावर घोडबंदर खिंड येथे गस्त घालीत असतांना जंगलात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये पडल्याचे त्यांना एका रहिवाशाने सांगितले. ही माहिती मिळताच काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करुन अज्ञात महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनेची गांभीर्यता पाहून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे समांतर तपासासाठी सोपविला. काशीमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर, जमादार अनिल वेळे, हवालदार चंद्रकांत पोशिरकर, संदीप शिंदे, किशोर वाडीले, पोलीस नाईक अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश श्रीवास्तव आदींनी घटनास्थळी मिळालेल्या एका चिठो-याच्या आधारे या महिलेच्या पतीचा शोध घेतला. त्याने अर्धवट जळालेले कपडे आणि पैंजणाच्या आधारे तो मृतदेह त्याची पत्नी निर्मलाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अबरार सोबत ती तिथे आल्याचे उघड झाले. तो गुलबर्गा (कर्नाटक) येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. तत्पूर्वी, नालासोपारा येथे पत्नीला भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला या पथकाने सोमवारी सायंकाळी अटक केली.

Web Title: The woman's murder suspect arrested in connection with immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.