...म्हणून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकर्‍या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 02:16 PM2020-02-13T14:16:20+5:302020-02-13T14:28:39+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकर्‍या भाजल्या.

Women activists of NCP made roti on Chula in thane | ...म्हणून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकर्‍या

...म्हणून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकर्‍या

Next

ठाणे - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्याध्यक्षा सुरेखा पाटील आणि विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकर्‍या भाजल्या.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत बुधवारपासून (12 फेब्रुवारी) वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे 144.5 आणि 145 रुपये प्रति सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे.  या दरवाढीचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोरच अनोखे आंदोलन करीत जोरदार निषेध केला. ‘बहुत हुई महंगाई की वार, चले जाओ मोदी सरकार’ मोदी सरकार हाय-हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, चुल्हा जलाओ- मोदी भगाओ” अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे चुल पेटवून भाकर्‍या भाजल्या. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी “मोदी सरकाने घरगुरती गॅस  सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ केली आहे.  महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेले हे सरकार केवळ श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगरीब माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. तरीही, मोदी सरकार गॅस सिलिंडर या मूलभूत गरजेकडे लक्ष देत नाही. मोदी सरकारने केवळ प्रसिद्धीसाठी उज्ज्वल योजनेंतर्गत गॅस सिलिंडर  देणार्‍या या मोदी सरकारची गरीबविरोधी नीती आता जनतेच्या समोर आली आहे. त्यामुळे आता देशातील मायभगिनीच मोदी आणि भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत, असे सांगितले. तर,  अच्छे दिनचे आश्वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे.  आधी रेशनिंग दुकानात रॉकेल मिळत होते. तेदेखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आम्हा महिलांना गॅस सिलिंडरऐवजी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुलीची ही धगच मोदी सरकारला भस्मसात करेल, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!

नेत्यांवरील गुन्हे जनतेला कळू देत, ते वेबसाईटवर प्रकाशित करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

 

Web Title: Women activists of NCP made roti on Chula in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.