महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:31 AM2020-02-14T00:31:11+5:302020-02-14T00:31:37+5:30

नरेंद्र मोदींचा राष्ट्रवादीने केला निषेध : केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Women activists stare at the stove | महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकऱ्या

महिला कार्यकर्त्यांनी थापल्या चुलीवर भाकऱ्या

Next

ठाणे : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन केले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी चक्क चूल पेटवून त्यावर भाकरी भाजून नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून घोषणा दिल्या.


घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत बुधवारपासून वाढ केली आहे. एलपीजी गॅसच्या किमतीतील ही सलग सहावी वाढ आहे. दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ठाण्यातील कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार निषेध केला. ‘बहुत हुई महंगाई की वार, चले जाओ मोदी सरकार, मोदी सरकार हाय-हाय, मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, चुल्हा जलाओ- मोदी भगाओ, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

‘मायभगिनी सरकारला सत्तेवरून खेचतील’
विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात सत्तेवर आलेले हे सरकार केवळ श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगरीब माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबला आहे. तरीही, मोदी सरकार गॅस सिलिंडर या मूलभूत गरजेकडे लक्ष देत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी उज्ज्वल योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देणाºया मोदी सरकारची गरीबविरोधी नीती आता जनतेसमोर आली आहे. त्यामुळे आता देशातील मायभगिनी मोदी आणि भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी उत्सुक झाल्या आहेत, असे प्रसारमाध्यमांना सांगितले.

‘चुलीची धग मोदी
सरकारला भस्मसात करेल’
अच्छे दिनचे आश्वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे. आधी रेशनिंग दुकानात रॉकेल मिळत होते. तेदेखील बंद केल्याने महिलांना गॅस सिलिंडरऐवजी चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुलीची ही धगच मोदी सरकारला भस्मसात करेल, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांनी केली.

Web Title: Women activists stare at the stove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.