अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:48 AM2020-10-24T11:48:53+5:302020-10-24T11:49:39+5:30
त्याआधी गांजा विकण्यास आलेल्या मेरी गणेश पवार (३८) हिला २४ हजार रुपये किमतीच्या गांजासह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली होती.
मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत अमली पदार्थांचीतस्करी-विक्री करणाऱ्या तीन गुन्ह्यांत तीन महिलांना अटक केली आहे .
मीरा रोडच्या जॉगर्स पार्कजवळ गांजाविक्रीसाठी आलेल्या ममता शिवप्रसाद सिंग (४४) हिच्याकडून पाच हजार ५०० रुपये किमतीचा ४०० ग्रॅम गांजा सापडला. तर, मीरा रोडच्या रेल्वे समांतर मार्गावर कार्तिक किशोरभाई सचदे (२६) या महिलेकडे एक किलो ४३० ग्रॅम गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत १९ हजार ६०० इतकी आहे. या दोन्ही महिलांना अटक केली आहे. नयानगरच्या नासिर दस्तगीर सय्यद (४४) याला पोलिसांनी ६५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थासह अटक केली आहे. याची किंमत ९७ हजार ५०० इतकी आहे.
त्याआधी गांजा विकण्यास आलेल्या मेरी गणेश पवार (३८) हिला २४ हजार रुपये किमतीच्या गांजासह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली होती.
घरात ११३५ ग्रॅम गांजा, तर तिचा साथीदार कुणाल गोसावी याच्याकडून १०२० ग्रॅम असा मिळून एकूण तीन किलो ३५३ ग्रॅम इतका गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याची किंमत ६७ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.