ठाणे स्थानकातील वन रुपी क्लीनिकमध्ये महिलेची प्रसूती; मायलेक सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 09:36 AM2019-10-10T09:36:21+5:302019-10-10T09:37:57+5:30
प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने कर्जत येथून प्रसूतीसाठी मुंबई,परळ येथील रुग्णालयात चाललेल्या महिलेची ठाणे स्थानकातील वन रुपी क्लिनीकमध्ये प्रसुती झाली.
ठाणे - सकाळीच प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने कर्जत येथून प्रसूतीसाठी मुंबई,परळ येथील रुग्णालयात चाललेल्या सुभान्ती पत्रा (29) या महिलेला धावत्या लोकलमध्ये त्या कळा जास्त प्रमाणात होऊ लागल्या. त्यामुळे तिला ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून तेथील वन रूपी क्लीनिकमध्ये नेले. तेथे तीची सुखरूप रित्या प्रसूती झाली तिने एका मुलाला जन्म दिला. हा प्रकार गुरूवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान घडला. दोघे मायलेक सुखरूप असून पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे. ही प्रसूती क्लीनिकचे डॉ. सलमान आणि नर्स यांनी केली असून महिला ही नवऱ्यासोबत प्रसूतिसाठी रुग्णालयात जात होती. तसेच क्लीनिकमधील ही दहावी यशस्वीरित्या पार पडलेली प्रसूतीची घटना असल्याची माहिती क्लीनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.