कसाऱ्याजवळ अपघातात महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:43 AM2018-12-26T03:43:32+5:302018-12-26T03:44:05+5:30
नाशिकहून भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअप गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली.
कसारा : नाशिकहून भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअप गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली.
नाशिकहून भाजीपाला घेऊन ही पिकअप गाडी मालाडला जात होती. कसारा बायपासजवळील हॉटेल रेडीयंट येथील उतार उतरत असताना पाठीमागून एका अनोळखी गाडीने पिकअप चालकाला कट मारल्याने पिकअप गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी दुभाजकावर आदळली. यात गाडीचा टायर फुटला व गाडी जागीच उलटली. गाडीत बसलेल्या जयश्री क्षीरसागर या गाडी खाली दबल्या गेल्या.
या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदन जाधव व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले. एका खाजगी क्रेनच्या मदतीने पिकअप गाडीला उचलून जखमी महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
रु ग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी लाखो रूपये खर्च करून खर्डी ग्रामीण रूग्णालय सुसज्ज केले आहे. डॉक्टर किंवा कर्मचारी यांच्याकडून रूग्णांची अशी हेळसांड होत असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- मंजुषा जाधव, अध्यक्षा, जि. प.
रुग्णालयात गैरसोय
जखमी झालेल्या जयश्री यांना रूग्णालयातील थंड कडप्यावर झोपवून उपचार करण्यात आले. लाखो रु पये खर्च करून खर्डी ग्रामीण रूग्णालय बांधले आहे. रूग्णांसाठी बेडची व्यवस्था आहे. पण कार्यरत डॉक्टर रूग्णांची हेळसांड करत अस्वच्छ कडप्यावर जखमींवर उपचार करतात. याबाबत तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडे विचारणा केली असता आम्ही असेच उपचार करतो असे उत्तर दिले. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी संपर्ककेला असता त्यांच्याशी होऊ शकला नाही.