उत्तम स्वास्थासाठी महिलांनी मोकळेपणाने संवाद साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:15+5:302021-03-16T04:40:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महिलांनी स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणे, स्वतःसाठी वेळ देणे, भूतकाळ आणि भविष्याचा ...

Women should communicate freely for better health | उत्तम स्वास्थासाठी महिलांनी मोकळेपणाने संवाद साधावा

उत्तम स्वास्थासाठी महिलांनी मोकळेपणाने संवाद साधावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : महिलांनी स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधणे, स्वतःसाठी वेळ देणे, भूतकाळ आणि भविष्याचा विचार न करता वर्तमानात असणाऱ्या गोष्टींचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे, असे मत समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ सिद्धी वैद्य यांनी व्यक्त केले.

महिला दिनाचे औचित्य साधून मधुमालती एंटरप्रायझेसतर्फे खास महिलांसाठी ‘नाते शरीराशी मनाचे संतुलन तिच्या आरोग्याचे’ हा विशेष मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी डोंबिवली पूर्वेत झाला. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या आणि त्यांचा परस्परांशी असलेला संबंध, या विषयावरील मुलाखतीत आयुर्वेदाचार्य डॉ. गायत्री मुळ्ये व वैद्य यांनी सहभाग घेतला.

महिलांमध्ये साधारणतः दिसणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या, या समस्या कशा ओळखाव्या, त्यांची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात दोन्ही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महिलांनी घर आणि काम सांभाळताना रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा, एखादा त्रास सुरू झाल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, यासंबंधी डॉ. मुळ्ये यांनी माहिती दिली.

स्त्रीने तिचे स्वास्थ्य जपण्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दोन्ही तज्ज्ञांनी दिला. तसेच शरीर आणि मनाचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी समजावून सांगितला. तर, प्राजक्ता वैशंपायन हिने तज्ज्ञांची मुलाखत घेतल्याचे आयोजक संदीप वैद्य यांनी सांगितले.

--------------

Web Title: Women should communicate freely for better health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.