"महिला पोलिसांची जास्त पदे भरावीत!"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:00 AM2020-10-06T01:00:43+5:302020-10-06T01:00:47+5:30

भाजपची मागणी; आयुक्तांची भेट घेणार

"Women should fill more police posts!" | "महिला पोलिसांची जास्त पदे भरावीत!"

"महिला पोलिसांची जास्त पदे भरावीत!"

Next

वसई : वसई-विरार परिसरातील महिलांवरील वाढते अत्याचार व विनयभंगांच्या प्रकरणी योग्य तपास करण्यासाठी यापुढे वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात महिला पोलीस अधिकाऱ्यांची जास्त पदे भरावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या मागणीसाठी लवकरच नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांची भेट घेणार आहेत.

नालासोपारा येथे १९ वर्षीय तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी चित्रा वाघ या नालासोपारा येथे आल्या होत्या. वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची त्यांनी भेट घेतली. या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नेमके काय झाले, त्याच्या चौकशीसाठी चित्रा वाघ नालासोपारा येथे आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबाला भेटल्या आणि घडलेल्या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात आमचे बारीक लक्ष आहे, दोषी पोलीस अधिकाºयावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना केली.

चित्रा वाघ यांनी या वेळी राज्य शासनावरही जोरदार टीका केली. महिनाभरात वसई-विरारमध्ये १०० पेक्षा जास्त बलात्कार, २०० पेक्षा जास्त विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती त्यांना पोलिसांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पोलीस आयुक्तांपुढे या घटना थांबवण्याचे आव्हान असणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की तसेच त्यांच्या कपड्यांना हात लावला असल्याचे समोर आले. त्याबद्दल बोलतानाही वाघ यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो. त्यामुळे असा प्रकार खपवून घेता कामा नये. राजकारणापलीकडे जाऊन कोणत्याही महिलेचा आत्मसन्मान राखला गेला पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

Web Title: "Women should fill more police posts!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.