दुर्लक्षित घटकांतील महिलांबरोबर ‘मातृसेवा’चा महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:32+5:302021-03-09T04:43:32+5:30
ठाणे : ‘व्यसनाचा विळखा आताच ओळखा’ हा ठाण्यातील मातृसेवा फाउंडेशनचा स्थायी उपक्रम आहे. शाळाशाळांतून हा उपक्रम राबवला जातो. परंतु, ...
ठाणे : ‘व्यसनाचा विळखा आताच ओळखा’ हा ठाण्यातील मातृसेवा फाउंडेशनचा स्थायी उपक्रम आहे. शाळाशाळांतून हा उपक्रम राबवला जातो. परंतु, महिला दिनाचे निमित्त साधून प्रथमच महिलांसाठी हा उपक्रम राबवला गेला. तसेच फाउंडेशनने सोमवारी आपला तिसरा वर्धापन दिन बालसुधारगृहातील मुलांसोबत साजरा केला. त्यामुळे फाउंडेशनतर्फे खऱ्या अर्थाने समाजातील दुर्लक्षित घटकांबरोबर हे दोन्ही दिवस साजरे केले.
बालसुधारगृहात येणारी मुले ही गुन्हेगार असतात आणि त्यांचे वर्तन सुधारावे, यासाठी त्यांना तिथे आणले जाते. वयाच्या अगदी चौदा-पंधराव्या वर्षांची ही मुले आणि ड्रग्ज, दारू, विविध औषधे, गांजा आणि इंटरनेटच्या व्यसनाचे बळी ठरले आहेत. अशा सवयी नियंत्रित करणे हे खूप कठीण काम आहे. परंतु, कुठेतरी सुरुवात होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत ‘मातृसेवा’च्या डॉ. सुनील कर्वे यांनी मुलांना हसतखेळत त्यांच्या शैलीत मार्गदर्शन केले. तेथील मुलांना लिहिता-वाचता येत होते, हे बघून समाधान वाटले. आम्ही त्यांना गोष्टीची पुस्तके वाटली, असे संस्थेच्या संध्या सावंत यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे देहविक्री करणे सोडलेल्या महिला आणि बालसुधारगृहातील मुले, रेड लाइट एरिया तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडणाऱ्या व्यक्ती यांच्यासोबत महिला दिन साजरा केल्याचे संस्थेने सांगितले. या दुर्लक्षित घटकांबरोबर संस्थेने संवाद साधला. संवादातून समोर येत गेलेल्या उपचारपद्धतीने रुग्ण बराही होऊ शकतो, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
-----------------------
मातृसेवा फाउंडेशनचा वधार्पन दिन हा महिला दिनी असल्याने दोन्ही दिवसांचे औचित्य साधून समाजातील दुर्लक्षित घटकांबरोबर हे दोन्ही दिवस साजरे करण्यात आले.
फोटो मेलवर.