वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:59 PM2020-06-23T18:59:43+5:302020-06-23T19:03:49+5:30
कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस उपायुक्त नेमण्यात यावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
कल्याण : रेल्वेने गाड्या सुरु केल्या असल्या तरी सरकारी व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच त्यातून प्रवास करण्याची मुभा आहे. गेले तीन महिने अनेकांना 'वर्क फ्रॉम होम' असे कामकाज करण्यास मुभा दिली होती. आता मुंबईत काम करणारे कल्याण-डोंबिवलीतील चाकरमानी कल्याण शीळ फाटा ते मुंबई असा प्रवास करतात. वाहतूक कोंडीमुळे मुंबईला जाण्या-येण्यास आठ तास लागतात. त्यामुळे सरकारने 'वर्क फ्रॉम कार' असे करावे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस उपायुक्त नेमण्यात यावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. कल्याण शीळ रस्त्याने आज कल्याणला कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी येणा-या दरेकर यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे हा प्रश्न त्यांनी आढवा बैठकीनंतर प्रकर्षाने मांडला. निळजे पूल व पत्री पूलाची पाहणी या दरम्यान त्यांनी केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. महापालिकेतील कोरोनाची स्टेज ही धोक्याचा अलार्म आहे. त्यावर मात करण्यासाठी व्हेटिंलेटर, ऑक्सीजन बेड आणि रुग्णवाहिकांची पुरेशी व्यवस्था नाही. मनुष्यबळाचाही अभाव आहे. आरोग्याची यंत्रणाच याठिकणी थिटी आहे अशी टीका दरेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर येत्या दहा दिवसात पुरेशी आरोग्य यंत्रणा उभारण्याचा अल्टीमेट टाईम प्रशासनाला दिला आहे. अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करणार आहे. मग म्हणू नका की, भाजपा कोरोनाचे पण राजकारण करीत आहे, असा इशाराही दरेकर यांनी महापालिका प्रश्न व सत्ताधा-यांना दिला आहे.
महापालिका हद्दीतील कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहे. त्याची काय स्थिती आहे ? याचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते दरेकेर यांनी अत्रे रंग मंदिराच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीस भाजपा खासदार कपिल पाटील, आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, गटनेते शैलेश धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार चव्हाण यांनी सांगितले की, सरकारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांची राहण्याची सुविधा मुंबईत करा ही मागणी केली गेली होती. त्याची दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत रुग्णांची संख्या वाढली. 450 रुपयांतील कोरोना रक्त चाचणी आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात सरकार करते. मग कल्याण डोंबिवली व ठाणे महापालिका हद्दीत का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला.
आणखी बातम्या...
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे