अंबरनाथ चिखलोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कारखाने आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 07:27 PM2017-12-04T19:27:42+5:302017-12-04T19:44:57+5:30
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.
अंबरनाथ - अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्या अनुशंगाने शासनस्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. मात्र धरनाची उंची वाढल्यावर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने आड येणार आहेत. धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रस धरणाला होणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याचे समार आले आहे.
अंबरनाथ पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी चिखलोली धरणाचा वापर केला जात आहे. या धरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करुन शहरात पाणी पुरवठा होत असल्याने या धरणाचे महत्व वाढत आहे. शहराला जास्त पाणी मिळावे यासाठी प्राधिकरणाने या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. धरणाची उंची 4 मिटर वाढल्यावर धरणाचे पाणलोटक्षेत्र देखील वाढणार आहे. याची कल्पना लघुपाटबंधारे विभाग आणि एमआयडीसी या दोघांनाही आहे. मात्र असे असतांना देखील धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कंपन्या उभारण्याचे काम सुरु आहे. या आधी देखील काम सुरु असतांना ते काम थांबविण्यात आले होते. आता पुन्हा संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु असल्याने धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतांना पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र त्यावर कोणताच तोडगा निघत नसल्याने धरणाला आणि धरणातील पाण्याला धोका निर्माण झाला आहे.