कामांच्या फाइल्स सरकल्याच नाही

By admin | Published: September 5, 2015 10:19 PM2015-09-05T22:19:15+5:302015-09-05T22:19:15+5:30

सत्ताधाऱ्यांसमोर काहीही न चालल्याने त्याचा फटका वॉर्डातील विकासकामांना बसला आहे. शहरात सर्वत्र काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असताना या ठिकाणी मात्र साधे यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ते

Work files do not move | कामांच्या फाइल्स सरकल्याच नाही

कामांच्या फाइल्स सरकल्याच नाही

Next

-  अनिकेत घमंडी,  डोंबिवली
सत्ताधाऱ्यांसमोर काहीही न चालल्याने त्याचा फटका वॉर्डातील विकासकामांना बसला आहे. शहरात सर्वत्र काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असताना या ठिकाणी मात्र साधे यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ते आणण्यात नगरसेवक हृदयनाथ भोईर अपयशी ठरले आहेत. यामुळे येथील नागरिकांना त्या सुविधेपासून वंचित राहावे लागले आहे. अशीच समस्या कचऱ्याचीही असून वेळोवेळी घंटागाडीची मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने काणाडोळा केल्याने नागरिक त्रस्त आहेत. घनश्याम गुप्ते क्रॉस रोडवरील कुंडीतून नेहमीच कचरा वाहत असतो.
विविध कामांच्या फाइल्स सादर करूनही त्या पुढे सरकलेल्याच नाहीत. पारंपरिक मतांच्या आधारावर निवडून आलेले जयहिंद कॉलनीचे नगरसेवक हृदयनाथ सुदाम भोईर हे सत्ताधाऱ्यांसमोर हतबल झालेले आहेत.
बुधवारचा आठवडाबाजारदेखील एक समस्या असून ती आता नागरिकांची गरज असल्याचे सांगून त्यांनी हात वर केले. वॉर्डात रस्ते-गल्ल्यांपेक्षा जास्त स्पीडब्रेकर असल्याने वाहनचालकांमध्ये संताप आहे. धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटचीही समस्या मोठी असून केवळ शासनाचे धोरण चुकीचे असल्याचे कारण देऊन या ठिकाणी ठाकुर्लीची घटना घडल्यानंतरही नागरिकांनी
महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही
ते केलेले नाही. त्यामुळे केवळ तांत्रिक
बाबीवर बोट ठेवून धन्यता मानून नगरसेवकानेही अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारले आहे.
वॉर्डात एकही गार्डन नाही, खेळण्याची सुसज्ज जागा नाही, त्यामुळे युवक-विद्यार्थी आदींसह ज्येष्ठांची गैरसोय होते. एकही मोठा प्रकल्प येथे झालेला नाही. बंदिस्त गटारे, रस्त्याचा आडोसा आदी भागात ज्येष्ठांसाठी बेंचेस (बाकड्यांची) सोय करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र त्याचा फायदा उपद्रवी घेतात. त्यामुळेही नागरिक त्रस्त आहेत.
केडीएमटीची बससेवा येथे नाही. कसेही कुठेही पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडीची समस्याही मोठी आहे. स्कूलबससह अन्य आपत्कालीन समस्येत त्याचा त्रास होतो. या परिसरात आनंदनगरचा काही भाग, आनंद कुटीर, सम्राट चौकाचा काही भाग, कांचनगौरी सोसायटी, सुदाम भोईर चौक आदी परिसर येतो.

यूटीडब्ल्यूटीअंतर्गत तीन वॉर्डांतून ११ कोटींची फाइल मंजुरीसाठी सादर केली होती. परंतु, ती मंजूर झाली नाही. स्थायीच्या सभापतीसह काही सदस्य तसेच केडीएमटीचेही सदस्य पश्चिमेला राहतात. तरीही, या ठिकाणच्या नागरी तसेच वाहतुकीच्या समस्या सुटलेल्या नाहीत. स्पीडब्रेकर असावेत, ही नागरिकांचीच मागणी. कचऱ्याची समस्या सोडवणे हे केवळ मलाच नव्हे तर महापालिकेला आव्हान आहे.
- हृदयनाथ भोईर, नगरसेवक

Web Title: Work files do not move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.