कोरोनामुळे पोरक्या झालेल्या बालकांसाठीच्या कृती दलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:31+5:302021-06-11T04:27:31+5:30
ठाणे : कोविडमुळे ज्या बालकांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल ...
ठाणे : कोविडमुळे ज्या बालकांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन झाले असून, त्याने आपले काम सुरू केले आहे. ठाणे जिल्ह्यातील कोविड-१९ च्या रोगामुळे ज्या बालकांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे, अशा बालकांच्या संगोपनासाठी (दरमहा रुपये १,१००), बालगृह योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच दत्तक बालक या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आपण चाईल्डलाईन संपर्क क्र. १०९८ (२४ x ७), अध्यक्ष / सदस्य, बालकल्याण समिती, ठाणे - ८७६६४४६५२०, जिल्हा बालसंरक्षण कक्ष - ७७०९३५८७७० व राज्यस्तरीय संपर्क क्र. ८३०८९९२२२ / ७४०००१५५१८ (सकाळी ८ ते रात्री ८) वर संपर्क करावा.
दानशूर व्यक्ती काही कालावधीसाठी बालकांचे पालकत्व (Foster Care) घेऊ इच्छित असाल तर तेही संपर्क साधू शकतात, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.