श्रमजीवीचा काशिमीरा पोलीस ठाण्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:06 AM2018-09-15T03:06:34+5:302018-09-15T03:07:09+5:30

उपअधीक्षकांना दिले निवेदन; आदिवासींवरच कारवाई करणाऱ्या पोलिसांवरही गुन्हे दाखल करा

Work on the Kashimira Police Station of Sharmajivir Kashi | श्रमजीवीचा काशिमीरा पोलीस ठाण्यावर मोर्चा

श्रमजीवीचा काशिमीरा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Next

मीरा रोड : आदिवासी जमिनी बळकावणाºयांना अटक करा तसेच आरोपींना पाठीशी घालत उलट आदिवासींवरच कारवाई करणाºया पोलिसांवरदेखील गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत श्रमजीवी संघटनेने बुधवारी काशिमीरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
काजूपाडा येथील सुरेश महादेव तारवी या आदिवासी शेतकºयाच्या जागेत तीन वर्षांपासून देवनारायण ठाकूर, राम भवन शर्मा, शिवशंकर ठाकूर, विनय तिवारी, जितेंद्र यादव आदींनी बनावट कागदपत्रांद्वारे कब्जा केल्याची तक्र ार तारवीसह श्रमजीवी संघटनेने चालवली आहे. पालिकेने तोड कारवाई केली असून वीजपुरवठा खंडित करण्याच्या याप्रकरणी पालिकेकडे सतत तक्र ारी करूनही कारवाई झालेली नाही. उलट, पोलिसांनीच आदिवासींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना त्यांच्याच जमिनीत जाण्यास मज्जाव केला
होता.
श्रमजीवी संघटनेने विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढू, असा इशारा देणारे पत्र ५ सप्टेंबर रोजी दिल्यावर ७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी देवनारायण ठाकूरसह त्याच्या साथीदारांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
बुधवारी श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, ठाणे अध्यक्ष रवींद्र गायकर, सचिव आत्माराम वाघेसह आदिवासींनी काशिमीरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आदिवासींच्या जमिनी बालकावणाºया भूमाफिया, बिल्डरना संरक्षण देणाºया व उलट आदिवासींनाच गुन्ह्यात अडकवणाºया काशिमीरा पोलीस ठाण्यातील अधिकाºयांवरसुद्धा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे भोईर म्हणाले. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा, यासाठी आग्रह धरला होता.

Web Title: Work on the Kashimira Police Station of Sharmajivir Kashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.