कोवीड रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात, लवकर ठाणेकरांच्या सेवेसाठी होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 06:05 PM2020-06-11T18:05:20+5:302020-06-11T18:06:51+5:30

ठाण्यात कोवीड रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्यात आले आहे, गुरुवारी त्याची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे रुग्णालय लवकरच ठाणेकरांसाठी खुले होणार असून वेळ पडल्यास अन्य ठिकाणी देखील अशा प्रकारचे रुग्णालय उभारता येऊ शकते का? याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

The work of Kovid Hospital will be started in the final stage for the service of Thanekar soon, said Eknath Shinde | कोवीड रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात, लवकर ठाणेकरांच्या सेवेसाठी होणार सुरु

कोवीड रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात, लवकर ठाणेकरांच्या सेवेसाठी होणार सुरु

Next

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत या उद्देशाने ठाण्यात १ हजार बेडचे कोवीड रुग्णालय साकार करण्यात आले आहे. अगदी कमी दिवसात हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. यावेळी त्यांच्या समवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल देखील उपस्थित होते. या रुग्णालयात १ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून येथे १०० आयसीयु बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, तसेच डायलेसीसचे १० बेडही राखीव ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. लवकर हे रुग्णालय कोरोना बाधीत रुग्णांसाठी खुले करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात करोनाची साथ आटोक्यात यावी आणि रु ग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने व अधिक प्रभावी पावले उचलण्यासाठी आघाडीवर राहून करोनाविरोधातील या लढाईचे नेतृत्व करत आहेत. तसेच, कोवीड रु ग्णालये व क्वारंटाइन केंद्रांना सातत्याने भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्रुटी दूर करत आहेत. करोनारु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रु ग्णांवरील उपचारांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी त्यांनी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे तात्पुरते रु ग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी ५०० खाटा विनाआॅक्सिजन, तर ५०० खाटा आॅक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असतील; शिवाय १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलेसीस सेंटर, तपासणी लॅब आदी अद्ययावत सुविधा देखील येथे असणार आहेत.
गेले दोन आठवडे हे रु ग्णालय उभारण्याचे काम दिवस-रात्र सुरू असून गुरु वारी शिंदे यांनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक नजीब मुल्ला, महापालिका आयुक्त विजय सिंघल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘तात्पुरत्या स्वरु पातील हे रु ग्णालय असले तरी जागतिक दर्जाच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच, गरज भासल्यास येथील क्षमता वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले. विक्र मी वेळेत या दर्जेदार रु ग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास ठाण्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारची रु ग्णालये उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: The work of Kovid Hospital will be started in the final stage for the service of Thanekar soon, said Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.