कोविड रुग्णालयातील बेड रिकामे असताना नव्या रुग्णालयाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 01:04 AM2020-08-25T01:04:09+5:302020-08-25T01:04:23+5:30

अंबरनाथमधील वास्तव : खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली

Work on the new hospital begins when the beds at Kovid Hospital are empty | कोविड रुग्णालयातील बेड रिकामे असताना नव्या रुग्णालयाचे काम सुरू

कोविड रुग्णालयातील बेड रिकामे असताना नव्या रुग्णालयाचे काम सुरू

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांची संख्या घटत असून खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे ३०० बेडचे रुग्णालय उभारले. या रुग्णालयात कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना १५० ते २०० रुग्ण एकाचवेळी उपचार घेत होते. मात्र कोरोनाचा प्रभाव जसजसा घटत गेला तसतसा या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यासोबतच शहराबाहेरील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर होते किंवा ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होतो ते रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतात. आजच्या घडीला अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात ८० ते ८५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या टक्केवारीनुसार हा आकडा केवळ ३० टक्क्यांच्या घरात आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ११५ असून त्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या घरात आहे.

दरम्यान डेंटल कॉलेजमधील २०० हून अधिक बेड रिकामे असतानाच अंबरनाथ नगरपालिकेने याच डेंटल कॉलेजमध्ये नव्याने १०० ते १५० बेडची व्यवस्था करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात काही आयसीयू कक्ष उभारले जात आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनसमोरील यूपीएससी सेंटरमध्येदेखील आॅक्सिजन यंत्रणा असलेले रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले आहे. भविष्यात रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने ही व्यवस्था केली जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Work on the new hospital begins when the beds at Kovid Hospital are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.