उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्त्याचे काम रखडले रस्त्याची दुरावस्था, हद्दीच्या वादातून दुरुस्ती नाही
By सदानंद नाईक | Published: July 24, 2022 04:34 PM2022-07-24T16:34:04+5:302022-07-24T16:35:19+5:30
कॅम्प नं-४ मोर्यानगरी येथील रिंग रस्त्याचे काम दोन महापालिकेच्या हद्दीतील वादामुळे रखडले असून वाहन चालक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर :
कॅम्प नं-४ मोर्यानगरी येथील रिंग रस्त्याचे काम दोन महापालिकेच्या हद्दीतील वादामुळे रखडले असून वाहन चालक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपूर्वीच एमएमआरडीएने रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे.
उल्हासनगर महापालिकेने काढलेल्या रिंग रस्त्या मधील मोर्यांनगरीचा भाग कल्याण महापालिकेतील माणेरे व आशेळे गाव हद्दीत येतो. शहरातील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महापालिकेनेच रिंग रस्ता निर्माण केला. या रस्त्यामुळे शहरातील अवजड वाहतुक रिंग रोडने वळून शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र कालांतराने दोन्ही गावाची लोक वस्ती वाढल्याने, त्याचा ताण रस्त्याच्या वाहतुकीवर पडला. तसेच रस्त्याचा मोर्यांनगरीचा एक तुकडा कल्याण महापालिकेत येत असल्याने, त्या रस्त्याच्या बांधणी वरून कल्याण व उल्हासनगर महापालिकेत वाद निर्माण झाला. त्यामुळे रस्त्याचे काम रखडून रस्ता खड्डयात गेला आहे. वाहने नीट चालवता येत नसल्याने, वाहने मुख्य रस्त्याने नेण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.
मोर्यांनगरी रस्ता प्रकरणी भाजप व शिवसेनेने स्टंटबाजी केली होती. त्यानंतर रस्त्याचे उदघाटन करण्यात आले. प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरवात न झाल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. एमएमआरडीएने रस्त्याच्या पुनर्बांधणी साठी २० कोटींचा निधी मंजूर केल्याचे बोलले जात असून या भागाचे आमदार गणपत गायकवाड यांनी रस्त्यासाठी पुढाकार घावा असे बोलले जात आहे. तर महापालिकेचे अभियंता अश्विनी आहुजा यांनी दोन महापालिकेच्या हद्दी वादातून रस्ता बांधणी रखडल्याने, एमएमआरडीएच्या निधीतून रस्त्याची बांधणी होणार आहे. असे आहुजा म्हणाले.
शहरातील रस्त्याची आयुक्तांकडून दखल
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ८ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. प्रत्यक्षात पावसाळ्या पूर्वी आधी अपवाद सोडल्यास खड्डेच भरले नसल्याचे उघड झाले. बहुतांश डांबरी रास्ताची दुरावस्था होऊन सिमेंट रस्ते उखडल्याने, त्यांच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले.