महामार्गावरील पादचारी पुलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:11+5:302021-03-16T04:40:11+5:30
ठाणे : ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्ञानसाधना कॉलेज ते गुरूद्वारा, भास्कर कॉलनी या दरम्यान पादचारी पुलाच्या कामाला रविवारी ...
ठाणे : ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्ञानसाधना कॉलेज ते गुरूद्वारा, भास्कर कॉलनी या दरम्यान पादचारी पुलाच्या कामाला रविवारी रात्री उशिरा सुरुवात झाली. यावेळी खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक विकास रेपाळे, एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या उपस्थित पुलाच्या कामाचे पूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.
या पुलाची लांबी ६८.७६५ मीटर असून, तो दोन भागांत असून, ज्ञानसाधनाकडील पुलाची लांबी २१.७९५ मीटर व नौपाडा, भास्कर कॉलनीकडील लांबी ४३.३७ मीटर आहे. त्याची रुंदी ३ मीटर असून, रविवारी रात्री ३ वाजेपर्यंत ज्ञानसाधनाकडील बाजूस असलेल्या पूल २ क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात आला, तर नौपाडा येथील पूल बसवण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे हा पूल सोमवारी मध्यरात्नी बसविण्याचे निश्चित केले आहे. या पुलाचे उर्वरित काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्ञानसाधना कॉलेज येथील विद्यार्थ्यांना व येथील ज्येष्ठ नागरिकांना तीनहातनाका येथून वळसा घालून जाण्याचा त्नास कमी होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी याठिकाणी लिफ्टची सोय करावी, अशी मागणी खासदार विचारे यांनी यावेळी केली. या कोपरी पुलाच्या रॅमचे काम २० एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन तो लवकरात लवकर खुला होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मधल्या पुलाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.