ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:14 AM2020-12-25T01:14:38+5:302020-12-25T01:15:08+5:30

Airoli-Katai project : या नवीन मार्गामुळे शीळफाटा येथील वाहतूककोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल.

Work on the second tunnel of the Airoli-Katai project begins, Dombivali can be reached in 15 minutes | ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य

ऐरोली-काटई प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू, डोंबिवली १५ मिनिटांत गाठणे होणार शक्य

googlenewsNext

ठाणे : ठाणे-बेलापूर एलिव्हेटेड मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली-काटई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला गुरुवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग करून सुरुवात करण्यात आली. यावेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यामुळे मुंबई, नवी मु्ंबई आणि कल्याण-डोंबिवली ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. तर, या नवीन मार्गामुळे शीळफाटा येथील वाहतूककोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. 
सध्या ऐरोली आणि मुंब्रा या दोन्ही बाजूंकडून या मार्गावरील टनेलचे काम वेगात सुरू आहे. त्याशिवाय, ऐरोली-काटई या मार्गाच्या पुढे वाय जंक्शन ब्रिजचे कामही सुरू आहे. शीळफाटा उड्डाणपुलाची निविदा प्रक्रियादेखील अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल. पूर्व मुक्तमार्ग (ईस्टर्न फ्री वे) ज्या पद्धतीने मुंबई ते ठाणे शहरांना जोडतो, तसाच हा ठाणे-बेलापूर एलिव्हेटेड फ्री वे असेल. त्यामुळे भविष्यात या भागात वाढणारी लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यांची गरज लक्षात घेता हा मार्ग वाहतूककोंडीची समस्या दूर करण्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
येत्या दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात डोंबिवलीनजीक फ्लायओव्हर येणार असल्याने तसेच शीळफाटा येथे ओव्हरब्रिज आणि अंडरपास येणार असल्याने भविष्यात या भागात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी कमी होईल. तसेच, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरपर्यंतच्या रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
कल्याण ग्रोथ सेंटर आणि विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्ग या परिसराचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Work on the second tunnel of the Airoli-Katai project begins, Dombivali can be reached in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.