वरसावे पुलाचे काम पुन्हा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:53 PM2018-12-03T23:53:27+5:302018-12-03T23:53:34+5:30

मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरु स्तीचे काम सुरू होण्याआधी अवजड वाहनांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड गेंटरी पोस्टचे काम मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे.

The work of Varasave Bridge will be postponed again | वरसावे पुलाचे काम पुन्हा लांबणीवर

वरसावे पुलाचे काम पुन्हा लांबणीवर

googlenewsNext

मीरा रोड : मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरु स्तीचे काम सुरू होण्याआधी अवजड वाहनांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड गेंटरी पोस्टचे काम मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. काम अपूर्ण असल्याने पुलाच्या दुरु स्तीचे काम सोमवारपासून सुरू झाले नाही. उद्या (मंगळवारी) दुपारपर्यंत गेंटरी पोस्ट बसवण्याचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर लगेच पूल दुरु स्तीचे काम सुरू करू, असे महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे.
वाहतुकीच्या नियोजनासाठी मोठी वाहने चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावरून भिवंडीमार्गे ठाणे-मुंबई आदी भागांकडे वळवण्यात येणार असल्याने चिंचोटी, मनोर व पुलाच्या आधी मोठ्या वाहनांना रोखण्यासाठी ओव्हरहेड गेंटरी उभारणे आवश्यक आहेत. सुरुवातीचे गेंटरी सदोष असल्याने महामार्ग पोलिसांनी त्यास आक्षेप घेत ते मजबूत असावेत तसेच चालकास अर्धा किलोमीटर लांबून ते दिसतील, असे दिवे लावण्याची सूचना केली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकूण पाच ओव्हरहेड गेंटरी पोस्ट बनवण्याचे काम सुरू केले. सोमवारपर्यंत ते बसवून दुरु स्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे यंत्रणेकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, गेंटरीचे उभे पोल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पण, त्यावरील आडवे पोल लावताना ते पोलिसांच्या उपस्थितीत विशिष्ट उंचीवर बसवणे गरजेचे असते. ते काम मंगळवारी पूर्ण होईल. गेंटरी लावून होताच अवजड वाहनांचे प्रवेश बंद होणार असल्याने मग पूलदुरु स्तीचे काम मंगळवार ते बुधवारी सकाळपासून सुरू करू, असे विभागीय व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले.
पुलाच्या दुरु स्तीचे काम लवकर पूर्ण करणे गरजेचे असून नाताळची सुटी सुरू झाल्यास वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे लवकर दुरु स्तीचे काम उरकण्याचा दबाव यंत्रणेवर आहे.

Web Title: The work of Varasave Bridge will be postponed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.