काम चालू पूल बंद, नवीन पुलावरुन होणार वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 05:21 PM2018-08-18T17:21:28+5:302018-08-18T17:23:09+5:30

जुना पत्री पूल सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंद करण्यात आल्याची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी काढली आहे.

Work will be closed from the existing bridge, the new bridge will run in thane juna patri pool | काम चालू पूल बंद, नवीन पुलावरुन होणार वाहतूक

काम चालू पूल बंद, नवीन पुलावरुन होणार वाहतूक

Next

ठाणे - जुना पत्री पूल सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंद करण्यात आल्याची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी काढली आहे. कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथील पत्री पुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्या आणि दुर्गाडीकडून सूचक नाकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे.

जुना पत्री पूल बंद करण्यात आल्याने ही सर्व वाहतूक आता नवीन पत्री पुलावरून होईल. जड-अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत होईल. मध्य रेल्वे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने जुना पत्री पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णत: बंद करावा, अशी सुचना केली होती. यापूर्वी जुना पत्री पूल हा हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची अधिसूचना जुलैमध्ये वाहतूक विभागाने काढली होती. मात्र, आता संपूर्ण वाहतूकच बंद ठेवण्यात येणार आहे.
 

Web Title: Work will be closed from the existing bridge, the new bridge will run in thane juna patri pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.