ठाण्यात आठव्या मजल्यावरून कोसळून मजूराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:43 PM2019-12-17T22:43:52+5:302019-12-17T22:51:11+5:30

एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून कोसळून सेनाऊल शेख (२०) या बांधकाम मजूराचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्याच्या शेठ जुरी बिल्डर्सच्या वर्तकनगर येथील साईटवर नुकतीच घडली. याप्रकरणी महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या बांधकाम सुरक्षा पर्यवेक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

 Worker dies after falling from eighth floor in Thane | ठाण्यात आठव्या मजल्यावरून कोसळून मजूराचा मृत्यू

बांधकाम सुरक्षा पर्यवेक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Next
ठळक मुद्देसुरक्षासाधनांचा अभाव वर्तकनगरची घटना बांधकाम सुरक्षा पर्यवेक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सुरक्षेच्या साधनांअभावी आठव्या मलल्यावरून कोसळून सेनाऊल शेख (२०) या बांधकाम मजूराचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्याच्या शेठ जुरी बिल्डर्सच्या वर्तकनगर येथील साईटवर नुकतीच घडली. याप्रकरणी सोमवारी महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या बांधकाम सुरक्षा पर्यवेक्षकाविरुद्ध सोमवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सेनाऊल यांचे मामा साईन शेख (२३, रा. मलंदा, पश्चिम बंगाल) यांनी १६ डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार ३ डिसेंबर रोजी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास शेख आणि त्यांचा भाचा हे शेठ बिल्डर्सच्या बांधकाम साईटवर काम करीत होते. त्यांना बांधकामाचा सुरक्षा व्यवस्थापक आणि शेठ यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची साधने न पुरविता तसेच कामाच्या ठिकाणी योग्य ते सुरक्षा साहित्य न देताच सेनाऊल हा याठिकाणी आठव्या मजल्यावर काम करीत होता. त्याचे काम सुरू असतांनाच तो तोल जाऊन खाली जमिनीवर कोसळला. यात त्याच्या मानेला, पाठीच्या भागाला, उजव्या पायाच्या गुडघ्यावर आणि कमरेवर जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. यात शेठ बिल्डर साईटवरील महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या सुरक्षा पर्यवेक्षकाने सुरक्षिततेची योग्य साधनसामुग्री न पुरविल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोपही शेख यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले.

Web Title:  Worker dies after falling from eighth floor in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.