पाणी उपसा करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू

By धीरज परब | Published: July 19, 2023 09:14 PM2023-07-19T21:14:48+5:302023-07-19T21:14:56+5:30

पोलिसांनी गुन्हा दाखल करून लेबर कॉन्ट्रॅक्टरला अटक केली आहे . 

Worker dies due to shock while pumping water | पाणी उपसा करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू

पाणी उपसा करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू

googlenewsNext

मीरारोड - मीरारोडच्या फेमिली केअर रुग्णालयाच्या वरती आणखी चार मजल्यांचे बांधकाम सुरु असताना साचलेले पाणी मोटार पंप ने उपसा करताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली . पोलिसांनी गुन्हा दाखल करून लेबर कॉन्ट्रॅक्टर ला अटक केली आहे . 

प्रसूतिगृह ह्या पालिका आरक्षणात बांधलेले तळ अधिक दोन मजली सेव्हन इलेव्हन रुग्णालय हे फेमिली केअर व्यवस्थापन चालवत आहे . गेल्या काही महिन्यां पासून ह्या जुन्या इमारतीवर आणखी चार मजले बांधण्याचे काम सुरु आहे . बुधवारी दुपारी चौथ्या मजल्यावरचे साचलेले पाणी इलेक्ट्रिक मोटार पंप ने काढताना शॉक लागून 

साहिनूर सराफत बैद्य  ( ३२ ) हा कामगार मरण पावला . आधी त्याला फेमिली केअर रुग्णालयात नेले होते . परंतु रुग्णालयाने वेळीच नवघर पोलीसाना जीवितहानीची माहिती दिली नाही . शॉक लागून मृत्यू च्या घटनेची चर्चा सुरु झाल्या नंतर सायंकाळी ४ च्या सुमारास पोलिसांना रुग्णालया कडून माहिती आली . 

या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून सायंकाळी ठेकेदार श्रीकुमार नायर व लेबर कॉन्ट्रॅक्टर इब्राहिम शेख यांच्यावर गुन्हा दाखल होऊन शेख याला अटक केली . 

उपनिरीक्षक संजय  लोखंडेमाळी हे तपास करत असून सदर बांधकाम कोणाचे आहे त्याची माहिती पोलीस घेत आहेत . बांधकाम धारकाची माहिती मिळाल्या नंतर त्यांना सुद्धा आरोपी केले जाणार असल्याचे पोलिसां कडून सांगण्यात आले . 

Web Title: Worker dies due to shock while pumping water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.