कार्यकर्त्यांना सेल्फीचा मोह आवरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:59 AM2019-04-19T00:59:20+5:302019-04-19T00:59:23+5:30

मतदारसंघातील भेटीगाठींदरम्यान उमेदवाराचा प्रचार करणे महत्त्वाचे असते.

Workers are relieved of selfie | कार्यकर्त्यांना सेल्फीचा मोह आवरेना

कार्यकर्त्यांना सेल्फीचा मोह आवरेना

Next

ठाणे : मतदारसंघातील भेटीगाठींदरम्यान उमेदवाराचा प्रचार करणे महत्त्वाचे असते. असे असूनही त्यातूनच सवड काढून रॅलीमधून सेल्फी काढण्याचा मोह पदाधिकाऱ्यांना आवरत नसल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. अनेक ठिकाणी भरउन्हात अशा भेटीगाठींदरम्यान दिवसाला १० ते १५ सेल्फी काढून नंतर फोटो फेसबुक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे. एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी आता झडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रचारात आता खºया अर्थाने रंगत चढू लागल्याचे दिसत आहे. एका उमेदवाराने एखाद्या ठिकाणी भेट दिली, तर दुसरा उमेदवारही तितक्याच ताकदीने मतदारांशी संवाद साधताना दिसतो. मात्र, मतदारांशी होणाºया या भेटीगाठींदरम्यानही सेल्फी काढण्याचा मोह अनेक पदाधिकाऱ्यांना आवरता येत नसल्याचे दिसते आहे. प्रचारादरम्यान किती गर्दी आहे, आम्ही देखील या प्रचारात हजर होतो, असे कदाचित दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे, ‘ले - ले सेल्फी ले ले’, असे म्हणत सध्या प्रचारात सेल्फी झोन शोधला जात आहे.

Web Title: Workers are relieved of selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.