घरे तोडल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 09:00 PM2019-11-25T21:00:44+5:302019-11-25T21:12:03+5:30

ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे ...

 Worker's birhad marcha at Thane collector's office to protest the demolition of houses | घरे तोडल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा

मुळच्या आदिवासीं, गरीब सामान्य असलेल्या एकाही गरिबाला उद्धवस्त होऊ देणार नाही असे पंडित यांनी यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करतेवेळी स्पष्ट केले. २०१५ पर्यंतच्या बांधकामांना नियमांकुल करण्याची मागणी यावेळी त्यांनी लावून धरली.

Next
ठळक मुद्देघरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी२७ नोव्हेबरला भिवंडीतील सर्व गोडाऊन बंद करण्याची घोषणाभुकेने मृत्युमुखी पडणाऱ्या जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत हे आपल्या जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे

ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. हा अन्याय असल्याचा आरोप करून त्याविरोधात शेकडो आदिवासींनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी केली.
     जिल्हातील भिवंडी , शहापूर , कल्याण , अंबरनाथ , मुरबाड व ठाणे भागातील आदिवासींची घरे तोडली जात आहेतत. त्याविरोधात शेकडो श्रमजीवी आदिवासींनी एकत्र येऊन हा भव्य मोर्चा काढून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर श्रमजीवीच्या या मोर्चाचे सभेत सुरूपांतर झाले. यावेळी उन्हात असलेल्या व्यासपीठावर पंडीत यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, माजी आमदार रूपेश म्हात्रे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष आर.सी. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. या बि-हाड मोर्चात सर्वाधिक संख्येने आदिवासी महिलांचा समावेश आढळून आला. कोंबड्या, बकऱ्या, भांडी, आदीं घेऊन हा बि-हाड मोर्चा श्रमजीवीने काढला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
      भिवंडी तालुक्यात प्रथम झालेल्या या कारवाईत आदिवासींचे घरे मोठ्याप्रमाणात तोडण्यात आली. मात्र भिवंडीतील गोडाऊनही तोडण्याचे आदेश असताना त्यावर मात्र कारवाई न करता प्रथम आदिवासींचे जुने व परंपरागत असलेले घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली. या अन्याया विरोधात मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच बंद करण्याची मागणी या आदिवासीं मोर्चेकरांनी केली. त्यांच्या या मोर्चाव्दारे आता गोडाऊन तोडण्याची कारवाई देखील थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मुळच्या आदिवासीं, गरीब सामान्य असलेल्या एकाही गरिबाला उद्धवस्त होऊ देणार नाही असे पंडित यांनी यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करतेवेळी स्पष्ट केले. २०१५ पर्यंतच्या बांधकामांना नियमांकुल करण्याची मागणी यावेळी त्यांनी लावून धरली.
     भारताच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण होत आहेत असे असताना आज गरिबांची मुलं भुकेने मरत आहेत, यापेक्षा दुर्दैवी काय आहे असा सवाल पंडित यांनी विचारला. भुकेने मृत्युमुखी पडणाऱ्या जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत, हे आपल्या जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कातकरी समाज आजही वेदनादयी जीवन जगत आहे, कातकरी उत्थान सुरू केले मात्र सर्व काही फक्त कागदावर आहे. २०२० पर्यंत सर्वांना घर देणारे आता लोकांची घरे झोपड्या तोडत आहेत.ही तर लोकशाहीची थट्टा मांडल्याचेही त्यांनी सांगितले.   

      यावेळी रूपेश म्हात्रे यांनी ही मार्गदर्शन करून या अन्याया विरोधात २७ नोव्हेबरला भिवंडीतील सर्व गोडाऊन बंद करण्याची घोषणा केली.
या मोर्चात कार्यध्यक्ष केशव नानकर, , उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, रामराव लोंढे, गणपत हिलीम, हिरामण गुळवी, राजेश चन्ने, दशरथ भालके, प्रमोद पवार, जया पारधी, संगीता भोमटे, जयेंद्र गावित, गणेश उंम्बरसडा, उल्हास भानुशाली आदी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Web Title:  Worker's birhad marcha at Thane collector's office to protest the demolition of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.