निवासी जागेसह वनपट्टे नावे करण्याच्या मागण्यासाठी ठाणेला श्रमजींवीचा निर्धार मोर्चाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:17 PM2020-02-25T15:17:51+5:302020-02-25T15:30:24+5:30

 माजी आमदार व श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लाखो आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. येथील साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यावेळी वाहतूक कोंडीला देखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.

Workers' determination to demand the names of forest land along with residential area | निवासी जागेसह वनपट्टे नावे करण्याच्या मागण्यासाठी ठाणेला श्रमजींवीचा निर्धार मोर्चाे

भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले

Next
ठळक मुद्देआदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाहीश्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले

ठाणे : देशाची ७५ री साजरे करण्यास मिळत असले तरी आदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाही. त्यांच्या या विविध समस्यांसह वन हक्क मिळवून देण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी श्रमजीवींनी मंगळवारी निर्धार मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.
       माजी आमदार व श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लाखो आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. येथील साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यावेळी वाहतूक कोंडीला देखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.
     या मोर्चाव्दारे वन हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह गावठाण विस्तार व गावठाण निर्मितीचा कालबध्द कार्यक्रम हाती घेणे, शासकीय व खाजगी घराखाालील जागा नावे करणे, जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षाची जाचक अट रद्द करणे, प्रत्येक आदिवासी व गरीब कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ घेणे, आदिम म्हणजे कातकरी जमातीच्या कुटुंबियाचे उत्थान करून वस्तीचा विकास करणे आदी मागण्यासाठी हा मोर्चा श्रमजीवी संघटनेकडून काढण्यात आला. माजी आमदार विवेक पंडित याच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो आदिवासी सहभागी झाले होते.

Web Title: Workers' determination to demand the names of forest land along with residential area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.