गॅस सिलिंडर वितरण करणारे कामगार कोविड लसीकरणापासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:48+5:302021-05-31T04:28:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोना काळात सर्व काही बंद असताना मार्च २०२० पासून घराघरांत स्वतःचा जीव धोक्यात घालून ...

Workers distributing gas cylinders are deprived of covid vaccination | गॅस सिलिंडर वितरण करणारे कामगार कोविड लसीकरणापासून वंचितच

गॅस सिलिंडर वितरण करणारे कामगार कोविड लसीकरणापासून वंचितच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोना काळात सर्व काही बंद असताना मार्च २०२० पासून घराघरांत स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरभर गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या सुमारे ८५० हून अधिक कामगारांना कोविड लसीकरण प्रक्रियेत प्राधान्य मिळत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांची कुचंबणा झाली आहे. ते ज्या ठिकाणी काम करतात, ते एजन्सीचालक प्रयत्नशील असले, तरी आधीच्या नियमानुसार अनेक कामगारांचे ४५ पेक्षा जास्त वय नसल्याने आणि आता वयाची अट शिथिल झाल्यानंतर लसीचा तुटवडा असल्याने या खऱ्या फ्रंटलाईन वर्करची समस्या कोण सोडवील, असा प्रश्न उभा राहिला आहे.

शहरात सुमारे दीड लाखाहून अधिक गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. ते आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अगदी आतापर्यंत घरी आहेत; पण सुमारे तीस, पस्तीस किलो वजन अंगावर घेऊन सिलिंडर वितरण करणारे कामगार मात्र फिल्डवर आहेत. सर्व गॅस कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही त्यांना मात्र फ्रंटलाईन वर्करची ओळख अद्याप मिळालेली नाही. खरेतर हे सगळे कामगार दिवसाला सुमारे ८० ते ९० हजार गॅस सिलिंडरचे वितरण करत असतात. हजारो नागरिकांच्या सान्निध्यात ते येत असतात. तरीही यांच्या कोविड लसीकरण प्रक्रियेला मात्र कोणीही प्राधान्य देत नसल्याने हा कामगार सुरक्षित नसल्याची भावना त्यांच्यातील काहींनी बोलून दाखवली.

एकीकडे नोकरी टिकविण्याचे दडपण, तर दुसरीकडे कुटुंब डोळ्यासमोर दिसत असल्याने हे सगळे कामगार लसीकरण होवो न होवो, काम मात्र नेटाने करीत आहेत. या कामगारांचे लसीकरण तातडीने करण्यासाठी कोणी पुढे येईल का याची प्रतीक्षा ते करीत आहेत. शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. मात्र, गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर नसल्याने अनेक अडथळे येत आहेत.

...............

भाजपच्या माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सहकार्य केले म्हणून आमच्या कामगारांनी लसीकरण करून घेतले; पण अन्य ठिकाणचे काय? या कामगारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणायला हवे. पण राज्य, केंद्र शासन याकडे लक्ष देत नाही. या कामगारांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे.

: अतुल देसाई, घरगुती गॅस सिलिंडर वितरण एजन्सी चालक

.............

सिलिंडर सॅनिटायझेशन कुठेही होत नाही. मुळात सॅनिटायझेशनमुळे एकाच्या हाताला आग लागल्याची माहिती समाज माध्यमावर आली होती. त्यामुळे गॅस सिलिंडर सॅनिटाईज करायचा की नाही हा प्रश्न एजन्सी चालकांसमोर असल्याचे सांगण्यात आले. केवळ कपन्यांमधून ते केले जाते; पण घरोघरी गेल्यावर मात्र तेथून रिकामे, भरलेले सिलिंडर परत घेतानाही ग्राहक तेवढे जागरूक नसल्याचेही स्पष्ट झाले.

...........

प्रतिक्रिया :

लसीकरणामुळे शरीरावर अन्य दुष्परिणाम होत असल्याचे ऐकण्यात आले होते. त्यामुळे लसीकरण करावे की न करावे असा मनात संभ्रम होता, त्यामुळे लसीकरण केले नाही.

: गॅस सिलिंडर वितरण करणारा एक कर्मचारी

..............

आम्ही जिथे काम करतो, तिथल्या एजन्सी चालकांनी काहीही करा, कामावर या, असे सांगितले; पण लसीकरण करण्याबाबत कोणी जबाबदारी घेत नाही. नोकरी टिकविणे गरजेचे असल्याने लसीकरण नाही झाले तरीही आम्ही घरोघरी सिलिंडर पोहोचवत आहोत. सुट्टीच्या दिवशी एक तर लस नसते किंवा मोठी रांग असते. नंबर लागता लागत नाही. कोणी नते मंडळी, अधिकारी ओळख पण दाखवत नाही.

: सिलिंडर वितरण करणारा एक कामगार

-----------

लसीकरण वैद्यकीय अधिकारी निंबाळकर यांचा कोट काल पाठवला आहे.

Web Title: Workers distributing gas cylinders are deprived of covid vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.