अन्यायाच्या संतापातून श्रमजीवी रस्त्यावर

By admin | Published: April 29, 2017 01:22 AM2017-04-29T01:22:47+5:302017-04-29T01:22:47+5:30

श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यावर सरकारी कामात अडथळा व महिला अधिकाऱ्यांला कोंडल्याच्या आरोपाखाली

Workers from the grudge of injustice, on the road | अन्यायाच्या संतापातून श्रमजीवी रस्त्यावर

अन्यायाच्या संतापातून श्रमजीवी रस्त्यावर

Next

पालघर : श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यावर सरकारी कामात अडथळा व महिला अधिकाऱ्यांला कोंडल्याच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील सहा तालुक्यात आंदोलने, रस्ता रोको, तर सफाई कामगारांनी काम बंद आंदोलने करुन आपला निषेध व्यक्त केला.
कुपोषण, पोषण आहार आणि अंगणवाडी सेविका यांच्या समस्यांबाबत सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित व कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची रवानगी १४ दिवसासाठी तुरुंगात करण्यात आल्यामुळे श्रमजीवी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. आपली बाजू सत्याची असल्याची कारणे देत त्यांनी गुरु वारी पालघर न्यायालयात जामीन नाकारीत विवेक पंडितासह आंदोलनकर्त्यांंनी तुरु ंगात जाणे पसंत केले होते. त्यांच्या व कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवारी बोईसर , पालघर वसई- विरार, मिरा-भार्इंदर, माणकिपूर, नायगाव, नालासोपारा येथे महानगर पालिका कामगारनी काम बंद आंदोलन केले. तर नाशिक-मुंबई महामार्ग काही वेळेसाठी रोखून धरला होता.
जिल्हा प्रशासनाद्वारे षडयंत्र रचून कुपोषण, भूकबळी, निकृष्ट पोषण आहार पुरवठा आदीं सारख्या गंभीर प्रश्नावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात संघटनेने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले आहे. आज वसई, पालघर, मोखाडा, जव्हार, विक्र मगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड ,वाडा, अंबरनाथ आदी तालुक्यात मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटनेच्या कार्र्यकर्त्यांनी प्रशासनाचा बळजबरीचा निषेध केला आहे. (वार्ताहर)
चित्रफितीद्वारे बनाव उघडा पाडणार-
प्रशासनाने एकतरी पुरावा दाखवावा असे आव्हान श्रमजीवी संघटनेने केलेले आहे. जोपर्यंत आमच्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही असे संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगून हा लढा पुढे तीव्र करण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. श्रमजीवी संघटनेने दिनांक २४ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या आंदोलन व घटनाक्र माची चित्रफीत प्रसिद्ध केल्याने प्रशासनाचा बनाव जनतेपुढे उघडा पडणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शुक्रवारी सुद्धा खुर्च्या रित्याच-
श्रमजीवी संघटनेचा निषेध व्यक्त करीत दोषींना अटक केली जात नाही तो पर्यंत जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी कामबंद आंदोलन केले होते. गुरुवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर मात्र शुक्रवारी जिल्हापरिषद व पंचायत समितीमध्ये अनेक खुर्चा रिकाम्याच असल्याचे दिसून आल्याने कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले .
श्रमजीवी संघटना विरु द्ध जिल्हा परिषद वाद पेटणार-
संजू पवार / विरार
सोशल मिडीयावर मी माझी खंत मांडून विवेक पंडित यांची बदनामी केली नाही. एका महिलेला कोंडून ठेवणे हा प्रकार रावणाने सीतामातेला बंदिस्त करून ठेवण्यासारखा आहे. या बाबत मी ठाम आहे. असे म्हणत झालेली पोलीस कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे संसदीय लोकशाही मार्गाने आंदोलन करणे चुकीचे नाही. अन्यायावर आवाज उठविले म्हणून आंदोलनच चिरडून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून न्यायालयातून जामीन न घेण्याच्या मतावर विवेक पंडित कायम असल्याने श्रमजीवी संघटना विरु द्ध जिल्हा परिषद वाद पेटणार असल्याचे दिसू लागले आहे.
श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित आणि पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्याचे परीणाम ग्रामीण भागातील कामकाजावर पडले आहे. श्रमजीवी संघटनेने पालघर, ठाणे, नाशिक, रायगड जिल्ह्यात आपले समर्थक कार्यकर्ते रस्त्यावर उतरवून आंदोलन सुरु केले आहे. पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यात धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. श्रमजीवी संघटनेने अंगणवाडीतील अन्नाचा दर्जा, विविध समस्यांबाबत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. शिष्यमंडळाने प्रत्येक प्रश्नावर धारेवर धरले असता निधी चौधरी यांच्याशी प्रचंड वाद झाला. चौधरी यांना धकाबुक्की करीत कोंडून ठेवल्याचे जाहीर केल्यानंतर वादाला सुरु वात झाली. यामुळे जिल्हा परिषद कर्मचारीने गेले तीन दिवस काम बंद आंदोलन केले आहे.
दुसरीकडे पंडित यांची बदनामी सोशल मिडीयावर होत असल्याचे पंडित यांनी आक्षेप घेऊन निषेध केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सोशल मिडीयाचा वापर करू नये असा नियम असून त्याचाही त्यांनी पालन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पंडित यांनी जामीन नाकारल्याने पालघर ठाणे आणि अन्य जिल्ह्यातून त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा मिळू लागला आहे. सरकारने अश्या वेळी हस्तक्षेप करून निर्णय घेणे आवश्यक असताना वरिष्ठ पातळीवरूनही बघ्याची भूमिका कायम ठेवल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होते आहे. दरम्यान, शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा श्रमजीवीने दिला आहे.

Web Title: Workers from the grudge of injustice, on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.