पदाधिका-यांसह सभापतींचा नव्याको-या गाड्यांसाठी हट्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:38 AM2018-02-19T00:38:12+5:302018-02-19T00:38:15+5:30
अस्तित्वात आलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सभापती व पाच पंचायत समित्यांच्या सभापतींकडून नव्या गाड्यांसाठी हट्ट धरण्यात आला आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : अस्तित्वात आलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सभापती व पाच पंचायत समित्यांच्या सभापतींकडून नव्या गाड्यांसाठी हट्ट धरण्यात आला आहे. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या सुमारे ११ नव्या गाड्यांच्या हट्टाची पूर्तता करण्यासाठी २१ फेब्रुवारीला होणा-या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांचे सभापती नुकतेच कार्यरत झाले. त्यांच्याकडून अद्याप विकासाची एक वीट लावण्यात आली नाही. मात्र, आल्याआल्या नव्या गाड्या खरेदी करण्याचा हट्ट पदाधिकाºयांकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गावपाड्यांचा सर्वांगीण विकास जलदगतीने करणे अपेक्षित आहे. यासाठी ठिकठिकाणच्या दौºयांचे नियोजन युद्धपातळीवर करून विनाविलंब घटनास्थळ वेळीच गाठण्यासाठी गाड्या खरेदीचा हट्ट असल्याचे सांगितले जात आहे. गाड्या खरेदीचा हा ठराव पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्राधान्याने मांडण्याचे निश्चित झाले आहे. ‘घसारा’ निधीतून या नवीन गाड्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.
या खरेदीस सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे अपेक्षित आहे. यानुसार, ठराव मांडून त्यास मान्यता घेऊन मनपसंत नव्या गाड्या खरेदीचा मार्ग मोकळा करण्याचा हा प्रयत्न आहे. या ठरावासाठी माजी पदाधिकाºयांच्या मार्गदर्शनासह अधिकाºयांचा सल्लादेखील घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पदाधिकाºयांच्या सध्या रस्त्यावर धावत असलेल्या गाड्या तशा फार जुन्या नाहीत; परंतु या गाड्या जादा धावल्यामुळे पदाधिकाºयांसाठी नव्या गाड्यांची गरज असल्याची चर्चा आहे. जिल्हा विभाजनाआधीच्या पदाधिकाºयांसाठी सध्याच्या गाड्या नव्याच घेतल्या होत्या, असेही जाणकारांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींना गाडी नसल्यामुळे त्या सध्या विभागाच्या अधिकाºयाच्या गाडीचा वापर करत आहेत.
पंचायत समित्यांचे सभापती व गटविकास अधिकारी या दोघांसाठी एकच वाहन वापरले जात आहे; पण सभापतींसाठी नवी गाडी खरेदी करण्यासाठी शासनाने आधीच परवानगी दिली आहे. त्यामुळे या गाड्या मिळणार आहे.