जाब विचारल्याने मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:01 AM2020-01-25T06:01:07+5:302020-01-25T06:01:42+5:30

सुटीच्या कालावधीत बेकायदा नळजोडणी केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने पालिकेत मजूर म्हणून कार्यरत असलेल्या कृष्णा गायकवाडने अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Worker's suicide attempt by asking for answers | जाब विचारल्याने मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

जाब विचारल्याने मजुराचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

उल्हासनगर : सुटीच्या कालावधीत बेकायदा नळजोडणी केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने पालिकेत मजूर म्हणून कार्यरत असलेल्या कृष्णा गायकवाडने अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नेताजी गार्डनशेजारील पालिका पाणीपुरवठा विभागातील मजूर कृष्णाने सुटीच्या कालावधीत बेकायदा नळजोडणी दिल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे आल्या होत्या. सुटीवरून परत आलेल्या कृष्णाला गुरुवारी सकाळी बेकायदा नळजोडणीबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश वानखडे व विजय मंगलानी यांनी जाब विचारला. याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ केली. त्याला कार्यालयाबाहेर बसण्यास सांगितले. मात्र, त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
गेल्या महिन्यात पदोन्नतीच्या प्रकरणी एका कर्मचाºयाने महापालिका मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्या दालनात पेट्रोल अंगावर टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

बेकायदा नळजोडणीला आळा घालण्याचा प्रयत्न
महापालिका हद्दीत एक लाख ८० हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र, त्या तुलनेत नळजोडणीची संख्या ८० हजारांपेक्षा जास्त असल्याने बेकायदा नळजोडणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता नळजोडणी घेतली जाते. या प्रकाराला आळा घालण्याचे काम विजय मंगलानी व शाखा अभियंता राजेश वानखडे करीत आहेत.

Web Title: Worker's suicide attempt by asking for answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.