महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

By अजित मांडके | Published: July 13, 2023 10:22 PM2023-07-13T22:22:38+5:302023-07-13T22:23:57+5:30

काही बेरजेची गणित असतात. भाजपसोबत झालेली युती भावनिक आहे. एक विचार आहे.

Working with Mahavikas Aghadi to create Mahakalank; Shinde targeted Uddhav Thackeray | महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

googlenewsNext

ठाणे : देवेंद्र यांना कलंक लावल्याचे बोलत आहात मात्र २०१९ ला महायुतीला स्पष्ट बहुमत असताना तुम्ही महाविकास आघाडी बरोबर जाऊन महाकलंक लावण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. अजित पवार विकासाला साथ देण्यासाठी एकत्र आले. काही बेरजेची गणित असतात. भाजपसोबत झालेली युती भावनिक आहे. एक विचार आहे. त्यामुळे काही चिंता करू नका २०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठबळ आपल्याला आहे, असे सांगून शिवसेनेतील आमदारांची अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला.

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला ठाण्यातून सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी ही टीका केली आहे.आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला पण पट्टा लावायची वेळ येईल असं काही जण बोलत आहेत, पण एकनाथ शिंदेला पट्टा ची काय भीती सर पे कफन बांध दिया तो क्या डरना आपल्याला पट्ट्याची काय गरज असे सांगत त्यांनी उद्धव यांची खिल्ली उडवली. संघटना मोठी करायची असेल तर कार्यकर्त्याला बळ द्याचे असते, त्याला मोठे करायचे असते हे मी अनेक वेळा बोलून झालो कोणाला ते तुम्हाला माहित आहे असे सांगत टीका केली. आगामी निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढायची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षा पूर्वी सत्तेत असताना सावरकरांच्या बाबत निर्णय घेता आला आणि किंवा आनंद साजरा करता आला नाही, ३७० कलम यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती, मात्र त्याचा देखील आनंद साजरा करता आला नाही, ४५ पेक्ष्या जास्त लोकसभा आणि २१० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार असल्याचे त्यानी सांगितले, काही बेरेजचे गणित करावी लागतात त्यामुळे आगामी निवडणूक महायुतीमध्ये लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि यापुढं तुम्हाला जिल्ह्यात एकनाथ शिंदे म्हणून काम करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब आणि दिघे यांच्या काळात आपण अनेक चढ उतार पाहिले पण त्यावेळी दिघे आपल्या सोबत होते. आता सुद्धा आपण अनेक चढ उतार पाहिले आहेत पण आपण लढणारे सेनीक असंल्याचे त्यांनी सांगितले. आज फडणवीस यांच्यामुळे राज्याचे नेतृव करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. मात्र अडीच वर्षे काहींनी केवळ १०० टक्के राजकारण केले पण त्यांनी काय मिळवले असा सवाल ही त्यांनी केला. स्वतःसाठी  नाही घेतला जनतेसाठी निर्णय घेणे महत्वाचे असल्याचे ही ते म्हणाले. सत्तेसाठी बाळासाहेब यांचे विचार पायदळी तुडवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण सत्तेची हवा डोक्यात गेली की काय होते हे आता समजले असेल असा टोलाही त्यांनी लगावला.  मुंबईत सत्ता असताना लोकांना खड्यातून प्रवास करायला लावला मात्र आता आम्ही काँक्रीट रस्ते सुरू केले असल्याचे ते म्हणाले.

आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे वाटचाल करायचे आहे.  त्यामुळे आगामी निडणुका या महायुती मधून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा प्रवेश -
या मेळावयाच्या निमित्ताने मुंबईच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुप्रिया मोरे व त्यांचे पती सुनील मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

Web Title: Working with Mahavikas Aghadi to create Mahakalank; Shinde targeted Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.