जागतिक एड्स दिन; ठाण्यात जनजागृती विषयक रॅलीचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:39 PM2022-12-01T12:39:12+5:302022-12-01T12:39:32+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदा ऑगस्ट 1987 मध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे.
विशाल हळदे
वचन पाळा आणि एड्स टाळा, असा नारा देत आज ठाण्याच्या सीव्हील हॉस्पिटलच्या वतीने आणि सीव्हील सर्जन डॉक्टर कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एड्सच्या जनजागृती विषयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील लोकांना एचआयव्ही संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदा ऑगस्ट 1987 मध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे.