ठाण्यातील ब्रह्मांड कलासंस्कारने उत्साहात साजरा केला जागतिक कला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 05:04 PM2019-04-21T17:04:45+5:302019-04-21T17:06:32+5:30

ब्रह्माण्ड कट्ट्यावर जागतिक कला दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

World Art Day is celebrated with enthusiasm in Thane's Universe Ceremony | ठाण्यातील ब्रह्मांड कलासंस्कारने उत्साहात साजरा केला जागतिक कला दिन

ठाण्यातील ब्रह्मांड कलासंस्कारने उत्साहात साजरा केला जागतिक कला दिन

googlenewsNext
ठळक मुद्देब्रह्माण्ड कट्ट्यावर जागतिक कला दिन साजरायदां पाचवे वर्ष साजरे वनवासी कल्याण आश्रमाच्या विद्यार्थींनी तारपा नृत्य केले सादर

ठाणे : सारे मिळून सर्वांसाठी... जिव्हाळ्याचे नाते जपणारे..  मुक्त व्यासपीठ ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित ब्रह्मांड कट्टयावर सांज-स्नेह सभागृह,* ब्रह्मांड पोलीस चौकी मागे,  आझादनगर, ठाणे येथे सर्व कला ह्या मानवी जीवनाचे भावपूर्ण अलंकरण आहे.  म्हणूनच दरवर्षी प्रमाणे  *ब्रह्मांड कलासंस्कारने* "जागतिक कला दिन" साजरा केला.  

ठाण्यात प्रथमच जागतिक कला दिन सुरु करणारी ही एक संस्था आहे व  यदां हे पाचवे वर्ष साजरे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी दिप प्रज्वलन करुव केली.  कला दिनाचा प्रारंभ सांज स्नेहच्या पटागंणात रंगीबेरंगी पोषाखात आलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या विद्यार्थींनी तारपा नृत्य सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार केली.  या नंतर दिपीका पांडे या बालकलाकार मुलीने शास्त्रीय कथ्थक नृत्य गणेश वंदना सादर करुन रसिकांची मने जिकंली.  आळी मिली गुप चिळी या बालनाट्यात शाळा सुटली पाटी फुटली, ससा तो ससा, सुसंगती सदा घडो,  चांदोबा चांदोबा भागलास का ही सर्व बालगीते आर्या सावंत,  अश्लेष सांवत,  स्वरुप रेडेकर,  संस्कृती रेडेकर व विहांन जोशी यांनी सादर केली.  चंद्र आहे साक्षीला शीर्षक असलेल्या कार्यक्रमात रुतु राज आज वनी आला , उगवला चंद्र पुनवेचा, कौसल्येचा राम बाई, जिथे सागरा,  चाफा बोलेना,  हे चांदणे फुलांनी,  पुनवेचा चंद्रमा आला घरी व कार्यक्रमाचा शेवट द्वदंगीत चंद्र आहे साक्षीला या गीताने झाला. ह्यात वर्षा गंद्रे,  मीरा वेलींग, विद्या जोशी व प्रसिद्ध गायक नितीन श्री यांचा समावेश होता. तबल्यावर साथ राजन गोरे यांनी केली. संवादिनी साथ विद्या जोशी तर किबोर्ड वर अभिजीत करंजकर यांची साथ लाभली.  हे वर्ष दिग्गज त्रयीचे, गदिमा,  पु.ल. व बाबुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांना "बटाट्याची चाळ" मधील संगितीका नाट्य प्रवेश सादर करुन दिली.  यात अपर्णा पटवर्धन,  पुनम रेडेकर व प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री गढीकर यांनी उत्तम अभिनय सादर केला.  "माझे बालपण हरवतेय" ही नाट्य छटा विहांन जोशी याने  सुदंर सादर केली व पालकांना विचार करण्यास भाग पाडले.  जागतिक कला दिनांचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे जादूगार मधुगंधा इंद्रजीत हीची जादू व निनाद पवार यांचा एकदम अनोखा बोलका बाहुला प्रयोग यांनी लहान थाेर मंडळीमध्ये हास्स्याचा खळखळाट निर्माण करुन गेले.  सर्व बालकालाकारांनी सदाबहार कोळी नृत्ये सादर करत रसिकांना ताल धरायला लावला. कार्यक्रमाचा शेवट दिनांक 3 फेब्रु. 2019 रोजी घेण्यात आलेल्या *ब्रम्ह कला फेस्ट 2019* या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस सभारंभने झाला. सदर बक्षीस वितरण सोनल आर्ट स्टुडियोच्या सोनल कुलकर्णी,  ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर,  मंगेश चोरगे व आशा दोंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.  जागतिक कला दिनी आकाशवाणी व दूरदर्शनचे भूपेंद्र मिस्त्री, विविध सामाजिक संस्थाशी निगडीत असलेले उल्हास कार्ले व लोढा संकुलातील सहकारी,  वनवासीचे विकास चितले,  संतोष टाफले,  रत्नमाळा ढाहके,  प्रदीप गेल्हे, स्वाती जोशी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कलासंस्कारच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे   तर स्वागत आयोजक राजेश जाधव यांनी केले. निवेदन आशा दोंदे व महेश जोशनी उत्तम करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनय जाधव आनंद खर्डीकर,  प्रगति जाधव स्नेहल जोशी, यशश्री आपटे रुपाली गंद्रे यांनी परिक्षम घेतले.

Web Title: World Art Day is celebrated with enthusiasm in Thane's Universe Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.