जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज ठरणार अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 08:02 PM2017-12-08T20:02:19+5:302017-12-08T20:10:48+5:30

अंबरनाथ शहर ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. या शूटिंग रेंजसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी याप्रसंगी अभिनंदन केले. 

The world class shooting range will be the precursor of the sports era of Ambernath city, the role of Guardian Minister Eknath Shinde | जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज ठरणार अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज ठरणार अंबरनाथ शहरातील क्रीडा युगाची नांदी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Next

ठाणे : अंबरनाथ शहर ऑलिंपिक दर्जाचे नेमबाज घडवण्यासाठी सज्ज झाले असून या ठिकाणी उभे राहणारे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ  शहरातील क्रीडा युगाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. या शूटिंग रेंजसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी याप्रसंगी अभिनंदन केले. 

अंबरनाथमधील विम्को नाका येथील पडीक जागेवर ठाणे जिल्ह्यातील पहिले जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज उभारण्यात येत असून त्याचे भूमीपूजन पालकमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी पार पाडले. अंबरनाथ शहर कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करत असून या शूटिंग रेंजमुळे अंबरनाथ शहर क्रीडा क्षेत्रात देखील नावारूपाला येईल,असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच समोरील सात एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्याचे देखील भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या क्रीडा संकुलात जॉगिंग करता ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक असणार आहे तसेच, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट तसेच अन्य खेळांना चालना देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शुटींग रेंज उपलब्ध आहेत. परंतु , मुंबईत फक्त वरळी येथे १० मी., २५ मी. व ५० मी.  या तीन लेनचे शुटींग रेज बांधण्यात आले आहे. जागतिक शुटींग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी २५ व ५० मी. ची रेंज आवश्यकता असते. अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना २५ व ५० मी. रेंजच्या शुटींग सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता. अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य नव्हते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची अडचण ओळखून कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये अंबरनाथ शहरात जागतिक दर्जाचे शुटींग रेंज व्हावे यासाठी सन २०१५ पासून सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. आज त्याचे फलित म्हणून विम्को नाका, अंबरनाथ पश्चिम येथील नगरपरिषदेच्या सुमारे सवा एकर जागेवर १० मी., २५ मी. व ५० मी. चे ३ लेनमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचे जागतिक दर्जाचे शुटींग रेंज बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार, शहरप्रमुख अरविंद वाळेकर,उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल वाळेकर, शहर अभियंता मनिष भामरे, अंबरनाथ रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबचे सुचिता देसाई, आनंद देसाई, जगदीश किनळेकर उपस्थित होते.

Web Title: The world class shooting range will be the precursor of the sports era of Ambernath city, the role of Guardian Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.