‘माझे आरोग्य माझा हक्क’ या घोषवाक्याव्दारे जागतिक आरोग्य दिन!
By सुरेश लोखंडे | Published: April 8, 2024 07:43 PM2024-04-08T19:43:52+5:302024-04-08T19:43:57+5:30
खरेच माझे आरोग्य उत्तम राखणे हा माझा हक्क आहे आणि हा हक्क मला मिळवून देणे हे शासनाचे धोरण आहे.
ठाणे: खरेच माझे आरोग्य उत्तम राखणे हा माझा हक्क आहे आणि हा हक्क मला मिळवून देणे हे शासनाचे धोरण आहे. यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणारा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि त्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहे. या सर्वांवर आपल्या हक्कासाठी अधिकार गाजविणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला हा हक्क प्राप्त करताना स्वतःच्या कर्तव्याचे भान देखील ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ठाणे जिल्हा रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ञ डॉ प्रसाद भंडारी.यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध सुविधा रूग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. रुग्णाला सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असणाऱ्या सुविधा आणि या सुविधांचा लाभ प्राप्त करून घेताना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी कर्तव्याचे भान ठेवले पाहिजे, असे जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात डॉ. भंडारी यांनी आपले मत स्पष्ट केले. यास अनुसरून त्यांनी एक कविताही सादर करून आरोग्य व यंत्रणेचे महत्व पटवून दिले.