जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन : एक धाव फ्लेमिंगोसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:22 PM2020-10-10T15:22:58+5:302020-10-10T15:24:07+5:30

ठाणे खाडीवर स्थित फ्लेमिंगो अभयारण्य याबद्दल येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटीच्या प्रोफेसर क्लारा कोरिया यांनी सर्व सहभागी धावपटूंना फ्लेमिंगो अभयारण्याबद्दल व इतर स्थलांतरित पक्ष्यांबद्दल रंजक माहिती दिली.

World Migratory Bird Day: One Run for Flamingos | जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन : एक धाव फ्लेमिंगोसाठी

जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन : एक धाव फ्लेमिंगोसाठी

googlenewsNext

ठाणे : नवी मुंबई, ठाणे, पालघर हे किनारपट्टीचे प्रदेश असल्यामुळे येथे विपुल प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचा वास असतो. परंतु गेल्या काही वर्षात झपाट्याने कांदळवन आणि पाणथळ जागांचा फार मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी ह्रास केला गेला. मुंबई महानगर प्रदेशात जमिनच शिल्लक राहिली नसल्यामुळे अतिरिक्त लोकसंख्येला सामावून घेण्याकरिता मग कांदळवन आणि पाणथळ जागा यांवर विकासकांची वक्रदृष्टी गेली. कांदळवन सुकवून जाळून, खाडीकिनारी डेब्रिस टाकून या जागा इमारती बांधण्यासाठी वापरल्या जात आहेत. याच बरोबर शहरामधील प्रदूषणकारी कारखाने खाड्या नासवत आहेत. या मानवी हस्तक्षेपामुळे, स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास झपाट्याने नष्ट होत आहेत.

दरवर्षी १० ऑक्टोबर या दिवशी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे निसर्गचक्रातील योगदान व त्यांचे अधिवास वाचविण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रयत्न याबाबत सामान्यजनात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट संस्था प्रयत्नशील आहे . त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे रन फॉर फ्लेमनगोस संकल्पनेला पाठिंबा द्यायचे ठरले. त्याप्रमाणे धावपटूंची एक टीम तयार करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मॅरेथॉनपटू ठाण्यातील सामाजिम कार्यकर्ते सुप्रसिद्ध डॉक्टर महेश बेडेकर यांनी टीम चे कप्तानपद स्वीकारले, २ दिवसांपूर्वी कोरोनावर यशस्वी मात करून परतलेले येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार याना विशेष निमंत्रित म्हणून विचारणा केली. तोवर क्षणाचाही विलंब ना लावता, निसर्ग रक्षणाकरिता असेल तर मी नक्की धावणार असे सांगून त्यांनीही होकार दिला. अशा प्रकारे येऊर येथील आदिवासी, ठाण्यातील भूमिपुत्र आगरी कोळी बांधव व पर्यावरणप्रेमी दहा ठाणेकर नागरिक या धावमोहीममध्ये सामील झाले. 

ठाणे खाडीवर स्थित फ्लेमिंगो अभयारण्य याबद्दल येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटीच्या प्रोफेसर क्लारा कोरिया यांनी सर्व सहभागी धावपटूंना फ्लेमिंगो अभयारण्याबद्दल व इतर स्थलांतरित पक्ष्यांबद्दल रंजक माहिती दिली. अनिर्बंध विकासामुळे पर्यावरणाचे असंतुलन झाले असून लगेचच यावर काही केले नाही तर तर येणाऱ्या काळात गंभीर नसैर्गिक अपडण आपल्याला सामोरे जावे लागेल असे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पर्यावरण दक्षता मंडळाच्या सुरभी वालावलकर यांनी मराठी मध्ये खाडीकिनाऱ्यांच्या स्वच्छतेबद्दल ते करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती विशद केली. येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रोहित जोशी यांनी कांदळवन आणि पाणथळ जागा वाचविण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट सारख्या विनाशकारी प्रकल्पांना प्रखर विरोध करून पर्यावरण रक्षण करण्याकरिता उपस्थितीतांना आवाहन केले.

Web Title: World Migratory Bird Day: One Run for Flamingos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे